सुर्ला पंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता कुंडईकर बिनविरोध

प्रतिनिधी
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

डिचोली तालुक्‍यातील सुर्ला पंचायतीच्या उपसरपंचपदाची माळ अपेक्षेप्रमाणे अनिता कुंडईकर यांच्या गळ्यात पडली आहे. रिक्‍त उपसरपंचपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत अनिता कुंडईकर यांची बिनविरोध निवड झाली.
 

डिचोली: डिचोली तालुक्‍यातील सुर्ला पंचायतीच्या उपसरपंचपदाची माळ अपेक्षेप्रमाणे अनिता कुंडईकर यांच्या गळ्यात पडली आहे. रिक्‍त उपसरपंचपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत अनिता कुंडईकर यांची बिनविरोध निवड झाली.
 
सुरेखा खोडगिणकर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्‍त झाले होते. रिक्‍त पदासाठी निवडणूक घेण्यासाठी पंचायत कार्यालयात पंचायत मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस अनिता कुंडईकर यांच्यासह भोला खोडगिणकर, सुरेखा खोडगिणकर आणि सुभाष फोंडेकर उपस्थित होते. 

उपसरपंचपदासाठी अनिता कुंडईकर यांनी सादर केलेल्या अर्जावर सुचक आणि अनुमोदक म्हणून अनुक्रमे सुरेखा खोडगिणकर आणि सुभाष फोंडेकर यांनी सही केली. निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित असलेले डिचोली गटविकास कार्यालयातील अधिकारी नवनाथ आमरे यांनी हा अर्ज ग्राह्य धरून कुंडईकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास पंचायत सचिव प्रजानंद नाईक बोरकर यांनी सहकार्य केले. goa

संबंधित बातम्या