Anjuna Police: हणजूण पोलिसांनी 12 तासात आवळल्या चोरट्याच्या मुसक्या

12 लाखांच्या चोरी प्रकरणी पश्चिम बंगालच्या एकाला अटक
Anjuna Police
Anjuna Police Dainik Gomantak

आसगाव येथे घराचा दरवाजा तोडून सुरक्षित लॉकरमधील 12 लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची तक्रार दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी मेहबूब मुल्ला यांनी हणजूण पोलिसांत केली होती. त्यानुसार पोलिसांनी मुळचा पश्चिम बंगालचा असलेल्या एका संशयिताला आज अटक केली. (Anjuna Police arrested one West Bengal native for theft of Rs.12 lakh ruppes at Assagao Bardez )

Anjuna Police
Cortalim Zuari Bridge: झुआरी पुलाची वाहतूक पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

मिळालेल्या माहितीनुसार हणजूण पोलिसांनी तक्रार दाखल होताच एक पथक तयार कले आणि घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरु केला. तपासादरम्यान जमिनीवर काही रक्ताच्या खुणा दिसल्या. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून तक्रारदाराच्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी एका कर्मचाऱ्याच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच वरील रोख रक्कम त्यानेच चोरी केल्याचे उघड झाले.

Anjuna Police
'Friendship Moto Cup: आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे दोन रायडर्स होणार सहभागी

आरोपीचे नाव बिश्वजित गौर असे असून तो मूळ कोलकाता, पश्चिम बंगाल येथील आहे. त्याच्यावर कलम 457, 380 IPC अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अवघ्या 12 तासांत अंजुना पोलिसांनी त्वरीत कारवाई केली. पुढील तपास पीआय प्रशांत देसाई, एसडीपीओ मापुसा जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली LPSI स्नेहा सावळ यांच्याकडे सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com