
Anjuna Tourist Attacked : दिल्लीच्या पर्यटकांनी रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच (आपली) बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण दुर्दैवी असले तरी यात रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याची चूक नाही.
पर्यटकांनी जारी केलेल्या ‘त्या’ व्हिडिओद्वारे चुकीचा संदेश सर्वत्र गेला. ज्यातून गोव्याची नाहक बदनामी झाली आहे, असे म्हणत गुरूवारी हणजूणवासीयांनी गोवा पोलिसांनी ‘त्या’ दिल्लीच्या पर्यटकांवर देखील कारवाई करावी,अशी मागणी केली.
हणजूण येथे दिल्लीच्या एका पर्यटक कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. घटनेच्या दिवशी (ता.5 मार्च) रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याने पर्यटकांविरोधात पोलिसात तक्रार दिली होती.
मात्र, पोलिसांनी अद्याप याची दखल घेतली नसून कोणताही गुन्हा नोंदविलेला नाही. मुळात पोलिसांनी पर्यटकांवर कारवाई करण्याची गरज आहे, असे स्थानिक गजानन तिळवे म्हणाले.
‘अतिथी देवो भवः’ या उक्तीचा आम्ही आदर करतो, परंतु पर्यटकांनी मद्यपान करून अशाप्रकारे गोव्यात दंगामस्ती करू नये. आतापर्यंत याप्रकरणी एकतर्फीच तपास झालेला दिसतो आहे.
पोलिसांनी सर्व बाजूने तपास करून दुसऱ्या गटातील (पर्यटक) लोकांवर कारवाई करावी. तसेच गरज पडल्यास आमची पोलिस स्थानकावर मोर्चा काढण्याची तयारी आहे, असा इशारा या स्थानिकांनी दिला.
...तर पोलिस महासंचालकांना भेटू !
येत्या सोमवारपर्यंत (ता.20) कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी जर कारवाई केली नाही,तर आम्ही पोलिस महासंचालकांना भेटणार व त्यांच्यासमोर स्थानिकांची बाजू मांडू, असेही या स्थानिक हणजूणवासीयांनी गुरुवारी सांगितले.
यावेळी हणजूण-कायसूवचे सरंपच लक्ष्मीकांत चिमुलकर, स्थानिक गजानन तिळवे, योगेश गोवेकर तसेच इतरांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील मागणी केली. गोमंतकीय लोक हे संयमी व शांत स्वभावाचे असून राज्यातील शांतता भंग झालेली आम्हाला नको, असेही त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.