मोफत पाण्याची घोषणा निवडणुकीपुरतीच

भरमसाठ बिले: काणकोणच्या रहिवाशांमध्ये पसरला असंतोष
Free water Announcement
Free water Announcement Dainik Gomantak

आगोंद: विधानसभेच्या निवडणुकीवेळी आप व अन्य राजकीय पक्षांनी गोवेकरांना मोफत वीज, मोफत तीर्थयात्रा देण्याच्या घोषणा केल्या.त्याला उत्तर म्हणून राज्य सरकारने 16 हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र निवडणूक संपताच पाण्याची हजारो रुपयांची बिल आल्याने काणकोणच्या रहिवाशांत असंतोष वाढत आहे. ही घोषणा केवळ निवडणुकीपुरतीच होती का,असा संतप्त सवालही केला जात आहे.

Free water Announcement
‘जीसीझेडएमए’ कार्यालयच बंद पाडू असा संघटनेचा इशारा

पाण्याच्या बिलानुसार प्रत्येक युनिट मागे रु. 25 प्रमाणे दर आकारला जात आहे. ही पाण्याची बिले 6 महिन्या नंतर देण्यात आली असल्याने एकदम युनिटसुद्धा वाढले आहेत. त्यामुळे पाणी बिलाच्या एकूण रकमेतही मोठी वाढ झालेली असून ती सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहरची आहेत.हजारो रुपयांची बिले परवडण्यासारखी नाहीत. संबंधित खात्याकडून प्रत्येक महिन्याला बिल दिले गेले असते तर बिलांच्या रकमेत काही प्रमाणात घट झाली असती. सरकार जनतेची लुबाडणूक करत असून यासंदर्भात प्रशासनाने ताबडतोब ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या काणकोण भागातून केली जात आहे.

Free water Announcement
वारखंड ग्रामपंचायत लढणार स्थगितीचा खटला: तुळसकर

अधिकारी अनभिज्ञ !

16 हजार लिटर पाणी मोफत देण्याची मुख्यमंत्र्यांच्या घोषणे संदर्भात पाणीपुरवठा विभागात अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तरे मिळत नाहीत. विचारणा केली असता खात्याचे अधिकारी यासंदर्भात कानावर हात ठेवत आहेत. लिखित स्वरूपात आपल्याला काहीच आदेश मिळाला नसल्याची कबुली देत आहेत,असे विशेष सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com