उद्यापासून सुरु होणार श्री मारुतीराय संस्थानचा वार्षिक जत्रौत्सव 

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

मळा पणजी येथील श्री मारुतीराय संस्थानचा वार्षिक जत्रौत्सव उद्या तारीख 22 पासून सुरू होत आहे.

पणजी : मळा पणजी येथील श्री मारुतीराय संस्थानचा वार्षिक जत्रौत्सव उद्या तारीख 22 पासून सुरू होत आहे. या जत्रौत्सवाची तयारी पूर्ण झालेले असून मारुतीरायाच्या मंदिरावर आकर्षक विद्दूत रोषनाई  करण्यात आली आहे. 

कोरोनाचे संकट असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदा दुकानांची संख्या काही प्रमाणात कमी झालेली असली तरी मारुतीरायांच्या  भक्तामधील उत्साह मात्र कमी झालेला नाही .विद्युत रोषणाईने सजवलेले  मारुतीरायाचे मंदिर  उंचावर असल्यामुळे ते जास्तच आकर्षक दिसत आहे. बसस्थानक व  त्या परिसरातून तर या मंदिराची रोषणाई डोळ्याचे पारने फेडते.

पणजीत कॉंग्रेसने रस्त्यावरच तळली भजी-पुरी; गॅस दरवाढीविरोधात आंदोलन

22  ते 25  असे चार दिवस होणाऱ्या जत्रौत्सवासाठी दरवर्षी शेकडो दुकानदार तथा फिरते दुकानदार ,फेरीवाले येथे दुकाने लावतात . या फेरीमध्ये दुकान लावल्यानंतर चार दिवसाचा जत्रौत्सव असल्यामुळे  गिराईकही  चांगले होत असते. त्यामुळे मारुतीरायाच्या मारुती गडावरील जत्रौत्सवाची  वाट हे फेरीवाले दरवर्षी पाहत असतात. मात्र यंदा कोरोनाचे संकट आहेच,  त्याचबरोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जत्रोत्सव आलेला असल्यामुळे खरेदीवर बरेच निर्बंध येणार असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. एक ते दहा तारखेपर्यंत जत्रौत्सव आला तर त्यावेळी खरेदी चांगली होते . कारण त्या वेळेला लोकांचे पगार झालेले असतात आणि त्यामुळे ते  मुद्दाम जत्रौत्सवाला येतात व खरेदीही करतात. मात्र महिन्याच्या वीस तारखेनंतर पगारातील बरीच रक्कम खर्च झालेले असते . त्यामुळे सहकुटुंब जत्रेला येणे किंवा आले तरी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास भाविक टाळाटाळ करतात. असेही या दुकानदाराने आपल्या अनुभवानुसार सांगितले. 

एकूणच उद्यापासून सलग पाच दिवस मारुतीराया संस्थानांमध्ये पहाटेपासून  ते मध्यरात्रीपर्यंत  विविध  कार्यक्रम होणार आहेत. यात पहाटेपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, संध्याकाळी पालखी मिरवणूक आणि रात्री भजन व  नाटकांचे आयोजन करण्यात आलेले आहे .

संबंधित बातम्या