
दोनापावल येथे राजभवनवर इंडियन रेड क्रॉस सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुरगाव शाखेने, अध्यक्षा फिओला रेगो यांच्या नेतृत्वाखाली सदर सभेत उपस्थिती लावून राज्यपालासमोर विविध विषय मांडले.
इंडीयन रेडक्रॉस संस्थेच्या देशभरात 1100 पेक्षा जास्त शाखा आहेत. यापैकी गोव्यात ही मुख्य शाखा व उपशाखा कार्यान्वीत आहेत. या सर्व शाखा राज्यपालांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून या शाखोची वार्षिक सर्वसाधारण सभा राज्यापालांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असते. त्यानुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटीची सर्वसाधारण सभा नुकतीच दोनापावल येथे राजभवनवर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
या सभेला वास्कोचे आमदार तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटी मुरगाव शाखेचे खजिनदार दाजी साळकर, आयआरसीएस गोवा शाखेचे अध्यक्ष गौरीश धोंड, उपाध्यक्ष मंगुरीश पै रायकर, सचिव दीपा प्रभुदेसाई / खजिनदार मारियो पी.डी. सांताना. तसेच राजेश साळगावकर, चंद्रकांत गावस, मुरगाव नगरपालिक नगरसेविका शमी साळकर, अर्नाल रेगो, विल्यम कार्डोझो, डॉ. सुवर्णा फोन्सेका व इतर सदस्य उपस्थित होते.
मुरगाव शाखेच्या अध्यक्षा फियोला रेगो यांनी मुरगाव शाखा कार्यालयाच्या नुतनीकरणाची प्रक्रिया सुरु असून दोन महिन्यात उद्घाटनासाठी तयार होणार असल्याचे राज्यपाल पी. एस. पिल्लई यांच्या नजरेस आणून दिले. वासकोचे आमदार तथा मुरगाव शाखेचे खजिनदार ताजी साळकर यांनी मुरगाव शाखा कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.