Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवर दुसरा भीषण अपघात, 2 ठार तर 10 जण गंभीर

पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसला कणकवली नजीक हळवल फाटा येथे भीषण अपघात झाला.
Highway Accident
Highway AccidentDainik Gomantak

पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली नजीक हळवल फाटा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. Accident on Mumbai-Goa Highway

या अपघातात अन्य 30 प्रवासी जखमी झाले असून दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

या अपघातात मृत झालेल्यांची ओळख पटली असून शैलजा प्रेमानंद माजी (वय- 56. रा. दोडामार्ग) व अण्णा गोविंद नाले (वय-52, रा. सातारा) अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रानी दिली.

Highway Accident
Ratnagiri Cylinder Blast: रत्नागिरीत सिलेंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू

पुण्याहून गोव्याकडे जाणारी सदरची लक्झरी गुरुवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हळवल फाटा येथे आली असता चालकाचा ताबा सुटून लक्झरी पलटी झाली.

अपघाताची खबर मिळताच स्थानिक नागरिक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती बर्गे, पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील, किरण मेथे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना लागलीच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरू करण्यात आले असून त्यातील दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Highway Accident
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 9 ठार

मुंबई गोवा महामार्गावर कणकवली शहरानजीक असलेल्या हळवल फाटा येथे तीव्र वळण आहे. या वळणावर यापूर्वी सातत्याने अपघात झाले आहेत. कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी गड नदीवरील पूलानंतर अचानक हे वळण समोर येते.

वेगात असलेले वाहन या ठिकाणी चालकाला आवरता येत नाही आणि अपघात घडतात. गेल्या काही महिन्यात सुमारे पाच ते सहा मोठी वाहने या ठिकाणी अपघातग्रस्त झाली आहेत. आतापर्यंत अनेक जणांना या ठिकाणी जीव गमवावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com