Forest Fire in Goa: म्हादई अभयारण्यात पुन्हा आग; आगीचे पंचनामे सुरू

काही तासांत आग नियंत्रण
Fire in Goa Forests
Fire in Goa ForestsDainik Gomantak

Forest Fire in Goa: महिन्याच्या सुरवातीला म्हादई अभयारण्यात लागलेल्या आगीचे पंचनामे सुरू आहेत. अशातच आज पुन्हा अभयारण्याच्या सुर्ला भागात आग लागल्याचे निदर्शनास आले.

स्थानिकांनी ही बाब वन खात्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर स्थानिकांच्या सहकार्याने खात्याने आग नियंत्रणात आणली.

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगींमुळे म्हादई अभयारण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा येथील जैवविविधतेला मोठा फटका बसला आहे.

Fire in Goa Forests
वडिलांच्या भीतीने बिहारचा 10 वर्षीय मुलगा आला गोव्यात, बेपत्ता झाल्याची तक्रार दिली, अखेर 10 दिवसांनी...

विविध ठिकाणी लागलेल्या आगी विझविण्यासाठी खात्याने अनेक प्रकारचे प्रयत्न केले. मात्र, वारंवार आग लागत आहे. त्यासाठी खात्याच्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहून 24 तास पहारा देणे गरजेचे आहे. अन्यथा अभयारण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.

आज लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी खात्याच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यामुळे वेळीच ही आग नियंत्रणात येऊ शकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com