Panaji Crime: पुण्यातील पर्यटकांना मारहाण प्रकरणात आणखी एकाला अटक

वेरे, बार्देश येथील महिलेला घेतली ताब्यात
Crime
CrimeDainik Gomantak

पणजी शहरातील लष्करी मुख्यालयाजवळ नो एंट्री लेनदरम्यान गाडी चालवणाऱ्या पर्यटकांना कथितपणे मारहाण केल्याची घटना शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती. या प्रकरणात पणजी पोलिसांनी आज वेरे, बार्देश येथील रोशनी कावस वय 28 या महिला अटक केली आहे. तर अब्दुल खादर अश्वाक वय 28 यालाही अटक केली होती. मात्र त्याची आता सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली असुन तो मूळचा कर्नाटकातील आहे.

(Another person arrested in the case of beating tourists in Pune)

Crime
Savio Rodrigues यांचा भाजपला घरचा आहेर; कला अकादमी निविदा प्रक्रियेची चौकशीची मागणी

पोलिसांनी तक्रारीबाबत सांगितले की, पुण्यातील सुमंथ राज श्रीवास्तव हे पर्यटनासाठी त्यांच्या मित्रांसह कारमधून प्रवास करत होते. आरोपींनी 8 ऑक्टोबर रोजी रात्री तक्रारदार सुमंथ राज श्रीवास्तव व त्यांच्या मित्रांना पणजी मार्केटमध्ये जाण्यापासून चुकीच्या पद्धतीने रोखले. तसेच स्कूटरने त्यांचा मार्ग अडवला आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, यावेळी त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली.

Crime
Dudhsagar App: 'ऑनलाईन' दुधसागर पर्यटनला स्थानिकांचा विरोध

यावरुन तक्रारदाराने आरोपीला पणजी पोलीस ठाण्यात नेले असता, त्या ठीकाणी ही पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पोलीस त्यांचे कायदेशीर कर्तव्य बजावत असताना अडथळा आणला आणि आरोपी महिलेने पोलीस ठाण्यातील संगणक आणि प्रिंटरचे नुकसान केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून आज या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com