खोर्ली - म्हापसा येथील आणखी सहाजण कोविड पॉझिटिव्ह

dainik Gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

शिरोडा येथील कोविड निगराणी केंद्रात ठेवलेल्या गंगानगर, खोर्ली - म्हापसा येथील अकरा रहिवाशांपैकी सहा व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी आढळून आले असून अन्य पाचजणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

म्हापसा
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात बार्बर पदावर काम करणारा गंगानगर येथील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींना म्हापसा येथील इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाइनमध्ये निरीक्षणाखाली ठेवले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांची पुन्हा चाचणी घेतली होती.
खोर्ली भागात शहरात सध्या कोरोना बाधितांची संख्या १२ झाली आहे. म्हापसा शहरात सध्या कोरोना पॉझिटिव्हचे एकूण १४ रुग्ण झाले आहेत. त्यात एकतानगरमधील दोन रुग्ण जे यापूर्वी बरे होऊन घरी परतले आहेत, त्यांचाही समावेश आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात काम करणारा गंगानगरमधील कर्मचारी तसेच गंगानगरमधील अन्य ११ रुग्ण सध्या कोविड निगराणी केंद्रात उपचार घेत आहेत.

संबंधित बातम्या