फातोर्डा भाजपात आणखी फूट, भंडारी युवा नेता दत्तप्रसाद मांद्रेकरांचा राजीनामा!

दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली फातोर्ड्यात काम करण्यास भाजप कार्यकर्ते नाराज मतदारसंघात फूट पडली, भंडारी युवा नेता दत्तप्रसाद मांद्रेकरांचा राजीनामा.
फातोर्डा भाजपात आणखी फूट, भंडारी युवा नेता दत्तप्रसाद मांद्रेकरांचा राजीनामा!
Dattaprasad MandrekarDainik Gomantak

दामू नाईक (Damu Naik) यांच्या नेतृत्वाखाली फातोर्ड्यात काम करण्यास कित्येक भाजप (BJP) कार्यकर्ते नाराज असून या मतदारसंघात आणखी फूट पडली आहे. फातोर्ड्याची भाजप दामू नाईक यांनी आपली खासगी कंपनी सुरु केली आहे असा आरोप करीत भंडारी युवा नेता दत्तप्रसाद मांद्रेकर (Dattaprasad Mandrekar) यांनी आज भाजप सदस्यत्वाचा (BJP member) राजीनामा (Resigned) दिला.

मांद्रेकर हे भाजपच्या ओबीसी (OBC) विभागाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच फातोर्डा प्रबगग 4 चे शक्ती केंद्र प्रमुख आहेत. त्यांनी त्याही पदांचा राजीनामा दिला आहे. दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली फातोर्डात भाजपला भवितव्य नाही असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Dattaprasad Mandrekar
गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार; आमदार दयानंद सोपटे!

या संदर्भात नाईक यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या फोनवर संपर्क केला असता त्यांनी कॉल न घेतल्याने त्यांची बाजू कळू शकली नाही.

यापूर्वी दामू नाईक यांच्या विरोधात मंडळ समितीचे दोन्ही सदस्य प्रमोद नाईक व मंदार सावर्डेकर यांनी बंड करताना गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्या व्यासपीठावर चढून सरदेसाई यांची स्तुती केली होती. त्यामुळे त्या दोघांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

या घटनेचे पडसाद अजूनही मिटलेले नसताना आता मांद्रेकर यांनी राजीनामा दिला आहे. आणखीही काही सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची महिती मिळाली आहे.

फातोर्डा भाजप मंडळाचे माजी सरचिटणीस दिलीप नायक यांनीही दामू नाईक यांच्या विरोधात प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व संघटनमंत्री सतीश धोंड यांच्याकडे तक्रार करताना नाईक यांना यावेळी भाजपची उमेदवारी दिल्यास ते 5 हजार मतेही घेऊ शकणार नाही असे म्हटले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com