राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अंशुमन अंतिम फेरीत

17,19 वर्षांखालील एकेरीच्या अंतिम फेरी दाखल.
राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अंशुमन अंतिम फेरीत
अंशुमन अगरवाल Dainik Gomantak

पणजी: गोव्याचा आघाडीचा टेबल टेनिसपटू अंशुमन अगरवाल याने राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत धडाका राखला. मडगावच्या राष्ट्रीय वयोगट ब्राँझपदक विजेत्या खेळाडूने 17 आणि 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली.

स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. 17 वर्षांखालील एकेरीत अंशुमनसमोर ॲझरिएल फर्नांडिस याचे, 19 वर्षांखालील एकेरीत खुशाल नाईकचे आव्हान असेल.

अंशुमन अगरवाल
Goa Futsal: आंबेली, पणजी फुटबॉलर्सचे वर्चस्व

अंशुमनने 17 वर्षांखालील मुलांच्या एकेरी उपांत्य लढतीत ॲरोन फारियास याच्यावर 3-0 (11-7, 11-7, 11-6) असा, तर ॲझरिएलने अक्षण लवंदे याच्यावर 3-1 (8-11, 11-4 , 11-4 , 11-7) असा विजय प्राप्त केला. 19 वर्षांखालील उपांत्य लढतीत अंशुमनने ॲझरिएलला 3-1 (9-11, 11-4, 11-6, 11-9) असे हरविले. खुशालने अक्षण लवंदेला 3-0(11-9, 12-10, 11-9) फरकाने पराजित केले.

Related Stories

No stories found.