गोव्यात कोळसा प्रश्नासंबंधी आंदोलन तीव्र

दैनिक गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

'गोव्यात कोळसो नाका' या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरदेसाई यांना भेटत सागरमाला प्रकल्प गोव्यासाठी कसा घातक आहे, हे स्पष्ट करणारे निवेदन दिले.

मडगाव- गोव्यात सध्या कोळसा खाणींविरोधातील आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळत असून सोमवारी केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या आंदोलनाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून सोमवारी यात आमदार विजय सरदेसाई यांनीही भाग घेतला. गोव्यातील पर्यावरणाला घातक असलेल्या सर्व प्रकल्पांना आमच्या पक्षाचा विरोधच असेल, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

दरम्यान, 'गोव्यात कोळसो नाका' या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरदेसाई यांना भेटत सागरमाला प्रकल्प गोव्यासाठी कसा घातक आहे, हे स्पष्ट करणारे निवेदन दिले.

फातोर्ड येथील रोजरी चर्च जवळून आंदोलनाला सुरूवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला वळसा घालून आंदोलन बोर्डा मार्गे मडगाव येथे आले. येथून आके, कोकण रेल्वे परिसराला वळसा घालून मडगाव शहरात आंदोलनाची समाप्ती करण्यात आली. कोळसा वाहतुकीला गोवा राज्यातून निषेध कण्यासाठी ही चळवळ या संघटनेकडून उभारण्यात आली आहे. या बरोबरच या संघटनेने दुहेरी रेल्वे मार्गालाही विरोध केला आहे. आंदोलन तीव्र करण्यासाठी दोन ऑक्टोबरपासून प्रत्येक गावात जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.        

संबंधित बातम्या