The Kashmir Files in IFFI 2022: 'द काश्मीर फाईल्स' वरील 'त्या' टिप्पणीचा सिनेकलाकारांकडून पुरता समाचार, म्हणाले....

The Kashmir Files in IFFI 2022: गोव्यातील इफ्फी सोहळ्याच्या समारोप समारंभात स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाईल्स' वर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मिडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
The Kashmir Files
The Kashmir Files Dainik Gomantak

गोव्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (iffi) काल म्हणजेच २८ नोव्हेंबरला सांगता झाली. ज्युरीने 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट 'प्रपोगंडा आणि वल्गर' चित्रपट असल्याचे घोषित केले, त्यानंतर या समारोप समारंभात एकच गोंधळ उडाला. इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी वादग्रस्त विधान करत म्हंटले की, महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आल्याने ते नाराज आणि आश्चर्यचकित झाले आहेत. नदाव लॅपिडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'द काश्मीर फाइल्स' ट्विटरवर ट्रेंड होत आहे. समारोपाच्या कार्यक्रमात ही घटना घडल्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता चित्रपटाच्या कलाकार आणि निर्मात्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

  • अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हटले...

अनुपम खेर यांनी ट्विट करत लिहिले की, 'खोट्याची उंची कितीही मोठी असली, तरी सत्याच्या तुलनेत ती नेहमीच लहान असते.' अनुपम खेर यांनी 'द काश्मीर फाइल्स' मधील त्यांचा फोटो ट्विटमध्ये शेअर केला आहे.

The Kashmir Files
'The Kashmir Files' ला 'वल्गर आणि प्रोपेगेंडा' म्हणणारे नादव लॅपिड आहेत कोण?
  • अभिनेता दर्शन कुमारची प्रतिक्रिया

चित्रपटामधील अभिनेता दर्शन कुमारने एका खासगी वृत्तपत्रासोबत केलेल्या संभाषणात सांगितले की, 'प्रत्येकाचे ते जे पाहतात आणि ऐकतात त्यावर त्यांचे एक मत असते, परंतु द काश्मीर फाइल्स हा चित्रपट (Movie) काश्मिरी पंडितांच्या समुदायावर आधारित आहे. हे सत्य नाकारता येणार नाही. जे अजूनही दहशतवादाविरुद्ध न्यायासाठी लढत आहे.' कुमार म्हणाला, 'हा चित्रपट अश्लीलतेवर नसून सत्यावर आधारित आहे.'

  • चित्रपटाच्या समर्थनार्थ अशोक पंडित

चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashoke Pandit) यांनी ज्युरींच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अशा विधानाला त्यांनी विरोध दर्शवला आहे. ते लिहितात की, 'नदाव लॅपिड यांनी 'काश्मीर फाइल्स' चित्रपटासाठी वापरलेल्या भाषेवर तीव्र आक्षेप आहे. 3 लाख काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड दाखवणे, अश्लील म्हणता येणार नाही. एक चित्रपट निर्माता आणि काश्मिरी पंडित या नात्याने मी दहशतवादाला बळी पडलेल्या लोकांप्रती या लज्जास्पद कृत्याचा निषेध करतो.

इफ्फीत नदाव लॅपिड काय म्हणाले?

इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नदाव लॅपिड यांनी  'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर आणि या चित्रपटाच्या इफ्फीमधील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

लॅपिड म्हणाले की, काश्मीर फाईल्स हा एक व्हल्गर चित्रपट आहे. या महोत्सवामध्ये तो कसा आला याचे मला आश्चर्य वाटते. तो एक प्रोपगंडा चित्रपट आहे. त्यामुळे मला त्याचे आश्चर्य वाटते. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले होते. अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक आणि स्पर्धात्मक विभागासाठी हा चित्रपट अतिशय अयोग्य वाटला. माझ्या या चित्रपटाविषयी असणाऱ्या भावना मी उघडपणे मांडतोय. कारण इतक्या प्रतिष्ठित महोत्सवात अश्या प्रकारच्या कठोर टीका या व्हायलाच हव्यात..!' असंही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com