‘मातृछाया’ आश्रमातर्फे अनुराधा मोघे सन्मानित

MOGE
MOGE


फातोर्डा

मातृछाया बालिका कल्याण आश्रमतर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरू म्हणुन आश्रमाच्या सदस्या व पत्रकार अनुराधा मोघे यांचा आश्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र नाईक यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला.
आपल्या आयुष्यात आई प्रथम गुरू असते तर शिक्षणात शाळेचे शिक्षक हे गुरू असतात. ते निःस्वार्थीपणे कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता विद्यार्थ्यांना शिकवतात. परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे हीच त्यांची गुरुदक्षिणा असल्याचे मोघे म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या आरंभी राधिका नाईक हिने स्वागत केले. प्रमुख अतिथीचे स्वागत सोनिया माणगावकर यांनी केले. वैशाली नाईक हिने आभार प्रदर्शन केले. आश्रमातील सर्व मुलींनी गुरुवंदनापर गीतगायन सादर केले. कार्यक्रमाला समिती सदस्य छाया म्हापसेकर, दिक्षा देसाई, अवधुत प्रभुदेसाई, वंदना पाठक, नीता नाईक हे मान्यवर उपस्थित होते.

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com