किशोरवयीन मुलींनो जरा सांभाळून!

शाळा- कॉलेजमधील किशोरवयीन मुलींना अपूर्वा प्रभूंचे उपदेशन
किशोरवयीन मुलींनो जरा सांभाळून!
Parra : शाळा- कॉलेजमधील किशोरवयीन मुलींना अपूर्वा प्रभूंचे उपदेशनदशरथ मोरजकर

पर्ये: शाळा- कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवकांमध्ये प्रेमाचे आकर्षण असते. अशा आकर्षणातून ते एकमेकांशी तासंतास खाजगीरित्या बोलत असतात. अशा बोलण्यातून बऱ्याच खाजगी गोष्टी शेअर होत असतात. यातून एकमेकांकडून आपले विशिष्ट अवस्थेतील विवस्त्र फोटो (unclothed pictures).आपल्या पाठवले जातात. तेव्हा मुलींनी आपली विवस्त्र अवस्थेतील फोटो आपल्या मित्राला पाठवू नये असे प्रतिपादन 181 च्या मदतनीस( हेल्पलाईन)( 181 helplines initiated by department of women and child development -goa) कार्यालयाच्या टीम प्रमुख अपूर्वा प्रभू यांनी केले.

Parra : शाळा- कॉलेजमधील किशोरवयीन मुलींना अपूर्वा प्रभूंचे उपदेशन
गरबा नृत्यातून संस्कृतीचे जतन: सरपंच वैशाली शेटगावकर
फोटो: केरी सत्तरी येथे महिला सुरक्षा कार्यक्रमावेळी अपूर्वा प्रभू यांना भेटवस्तू देताना उज्वला पारोडकर, अपेक्षा परब व पौर्णिमा केरकर
फोटो: केरी सत्तरी येथे महिला सुरक्षा कार्यक्रमावेळी अपूर्वा प्रभू यांना भेटवस्तू देताना उज्वला पारोडकर, अपेक्षा परब व पौर्णिमा केरकर दशरथ मोरजकर

जर एखाद्या मुलाचे खरेखुरे प्रेम असेल तर तो अशा अवस्थेतील फोटो मागणार नाही. जेव्हा तो असे फोटो मागतो म्हणजे त्याच्यामध्ये काही तरी खोट आहे असे त्यांनी सांगितले. आजकाल शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींचे त्यांच्या मित्राकडून अशा प्रकारचे फोटो घेऊन त्याचा नंतर गैरवापर केलेला आहे. तसेच अशा फोटोच्या आधारे मुलींना ब्लॅकमेल करून तिच्या लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करणारे प्रकरणे समोर आली आहे तेव्हा मुलींनी अशा प्रकरणी दक्ष राहावे असे त्यांनी बजावले. तसेच जर एखादी मुलगी अशा गुंत्यामध्ये सापडली असल्यास त्यांनी 181 या हेल्पलाईनवरून मदत घ्यावी असे त्यांनी सांगितले.

Parra : शाळा- कॉलेजमधील किशोरवयीन मुलींना अपूर्वा प्रभूंचे उपदेशन
तंबाखू उत्पादनांच्या जाहिराती माघार घेण्याच्या निर्णयाचे स्वागत...

केरी सत्तरीतील विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठान यांनी महिला सुरक्षा आणि 181 ची कार्य याविषयी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम महिला आणि बाल कल्याण खात्याच्या सहकार्याने आयोजित केला होता. या कार्यक्रमात 181 च्या प्रमुख अपूर्वा प्रभू यांनी मार्गदर्शन करताना वरील सल्ला दिला. यावेळी विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पौर्णिमा केरकर, 181 हेल्पलाईनच्या पोलिस कर्मचारी अपेक्षा परब आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अपूर्वा प्रभू यांनी गोव्यात कार्यरत असलेल्या 181 या हेल्पलाईनबद्दलची माहिती दिली. महिलांना मार्गदर्शन, समुपदेशन व महिलांवर त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात अत्याचार होत असेल तर त्याचा बचाव करण्याचे कार्य करते. 181 ची ही सेवा सतत दिवस रात्र 24 तास सुरू असते. समुपदेशन फोन वरून, बांबोळीतील 181 च्या कार्यालयात किंवा इतरत्र ठिकाणी जाऊन दिले जाऊ असे त्यांनी सांगितले.

Parra : शाळा- कॉलेजमधील किशोरवयीन मुलींना अपूर्वा प्रभूंचे उपदेशन
गोव्यातील महिला सांगताहेत धोरण कसे असावे..!

घरेलू हिंसावर मदत

त्याचबरोबर घरेलू हिंसा रोखण्यासाठी ही हेल्पलाईन मदत करीत आहे. एखाद्या महिलेवर तिच्या घरामध्ये अत्याचार होत असेल तर ही हेल्पलाईन मदत करते. तसेच शाळा कॉलेजमधील मुली जर शारीरिक किंवा मानसिक अत्याचारात सापडल्यास ही हेल्पलाईन मदत करते आणि याची ती विश्वासार्हता जपून ठेवत असल्याचे अपूर्वा प्रभू यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावित पौर्णिमा केरकर यांनी, सूत्रसंचालन शुभदा च्यारी तर रश्मीता सातोडकर यांनी आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.