भाषांतरीत पुस्तक पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मंगेश बोरकर
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

दिनेश मणेरकर यांनी रामनाथ मणेरकर स्मृती भाषांतरीत पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार ३० सप्टेंबर रोजी कोकणी भाषा मंडळाच्या ५८व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिला जाईल.

फातोर्डा
दिनेश मणेरकर यांनी रामनाथ मणेरकर स्मृती भाषांतरीत पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार ३० सप्टेंबर रोजी कोकणी भाषा मंडळाच्या ५८व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिला जाईल. १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधित प्रकाशित झालेली भाषांतरीत पुस्तके या पुरस्कारासाठी पात्र आहेत. लेखक किंवा प्रकाशकाने आपल्या पुस्तकाच्या चार प्रति, सरचिटणीस, कोकणी भाषा मंडळ, कोकणी भवन, शंकर भांडारी रस्ता, विद्यानगर, घोगळ, मडगाव या पत्त्यावर १४ ऑगस्टपर्यंत पाठविणे गरजेचे आहे. ज्या पुस्तकांना साहित्य अकादमी किंवा इतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत, अशा पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही, असे मंडळाच्या सरचिटणीसांनी कळविले आहे.  

संपादन ः संदीप कांबळे
 

संबंधित बातम्या