गोवेकरांना वर्षभर चाखता येणार ‘मानकुराद’ची चव

गोव्यात स्ट्रॉबेरीच्या यशस्वी प्रयोगानंतर सफरचंद, बटाट्याची लागवड
गोवेकरांना वर्षभर चाखता येणार ‘मानकुराद’ची चव
Apple potato cultivation after successful experiment of strawberry in GoaDainik Gomantak

पणजी: गोव्‍यात (Goa) स्टॉबेरीच्या यशस्वी प्रयोगानंतर आता देशी बटाटे (Potato) आणि सफरचंद (Apple) उत्‍पादनासाठी संशोधन चालविले आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्यातील दोन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर बटाट्यांची लागवड केली जाणार असल्याची माहिती भारतीय किनारी कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रवीणकुमार (Dr. Praveen Kumar director of Indian Coastal Agricultural Research Institute) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य कृषी उत्पादनांच्या बाबतीत परावलंबी आहे. बटाटे, फ्लॉवर आणि सफरचंदाचे उत्पादन होणारच नाही, अशी धारणा आहे. पण, विशेषतः बटाटे पिकविण्याचा प्रयोग यशस्वी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न चालले आहेत. दोन ठिकाणांची निश्‍चिती करण्यात आली असून तेथे 400 चौ.मी. इतक्या जागेत प्रायोगिक तत्वावर बटाट्यांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी माती आणि तापमानाचे परीक्षण करण्यात आले असून अपेक्षित यश मिळेल, अशी आशा असल्याचा दावा डॉ. प्रवीणकुमार यांनी केला.

Apple potato cultivation after successful experiment of strawberry in Goa
गोव्यातील शेतकरी आता ‘ऑनलाईन’!

कुपरी सूर्या, कुपरी लिमा, कुपरी किरण, कुपरी थारवन आणि पुष्कराज या पाचही बटाट्यांच्या प्रजातीची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक आहवाल सिमला येथील पोटॅटो संस्थेकडे पाठविण्यात आला आहे. तेथूनच बियाणे आणली जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. गोव्यात स्टॉबेरीचे पीक येणारच नाही, असे सगळ्यांना वाटायचे. आता लोकांना आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु, राज्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आम्ही हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी पराकाष्टा करणार आहोत, असे ते म्हणाले.

Apple potato cultivation after successful experiment of strawberry in Goa
गोव्यात कशी केली जाते कचऱ्यापासून वीजनिर्मिती

सफरचंदही उत्‍पादन घेणार

सफरचंद पिकविण्याचा प्रकार उत्तर भारतातील अनेक राज्यातही यशस्वी झाले नसताना प्रथमच राज्यात प्रायोगीक तत्वावर सफरचंद लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. येत्या दोन महिन्यात त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती डॉ.प्रवीणकुमार यांनी दिली.

‘मानकुराद’ची चवही चाखता येईल वर्षभर

मानकुराद आंब्यासह विविध हंगामी गोवन फळांवर विविध संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया करून टेट्रापॅकमधून त्यांची चव अगदी वर्षभर चाखण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. ड्रोणद्वारे नारळ काढण्याची योजना अंतिम टप्प्यात असून येत्या दोन वर्षात हा उपक्रम संपूर्ण देशभर पोहोचेल. किनारी प्रदेशातील स्थानिक भाजी पाल्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विशेष संशोधन हाती घेण्यात आले आहे. व्हेजीफास्ट तांत्रिक प्रणालीद्वारे शहरी भागातही भाजीपाल्याची लागवड केली जाणार आहे. खाजन शेतीत केवळ भात पिकते, तेथे इतरही पिके घेण्याच्या दृष्टीने संशोधन करण्‍यात येणार आहे.

Related Stories

No stories found.