गोमेकॉ इस्पितळात अर्ज नसतानाही 'ऑर्थोपेडिक' सहाय्यकपदी नियुक्ती

सरकारला नोटीस: गोवा खंडपीठात याचिका, प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना
गोमेकॉ इस्पितळात अर्ज नसतानाही 'ऑर्थोपेडिक' सहाय्यकपदी नियुक्ती
Gomeco HospitalDainik Gomantak

पणजी: गोमेकॉ इस्पितळात ऑर्थोपेडिक सहाय्यक पदासाठी अर्ज न केलेल्या दोघांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, असा दावा करणारी याचिका नझिरा खान हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली आहे. या पदासाठी ज्या पाचजणांची नियुक्ती झाली आहे त्यांना नोटीस बजावून अवर सचिवांना (कार्मिक) खंडपीठाने 10 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे व प्रतिज्ञापत्र न दिल्यास 15 जूनला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑर्थोपेडिक सहाय्यकाच्या 5 जागांसाठी आरोग्य खात्यातर्फे जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील 237 उमेदवार या पदासाठी शैक्षणिकदृष्ट्या पात्र ठरवण्यात आले होते.

Gomeco Hospital
गोव्यातील रेती उत्खनन रोखण्यात निष्काळजीपणा...

या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 124 उमेदवार बसले होते. पात्र व लेखी परीक्षेसाठी यादी जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये ऑर्थोपेडिक सहाय्यक पदासाठी ज्या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची नावे नव्हती. यासंदर्भात माहिती हक्क कायद्याखाली आवश्‍यक ती माहिती मागण्यात आली मात्र ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे याचिका सादर करताना सर्व माहिती त्यासोबत देण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे ही माहिती देण्यासही निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ॲड. विजय पालयेकर हे याचिकादाराची बाजू मांडत आहेत.

याचिकादार नझिरा खान ही गेली पाच वर्षे ऑर्थोपेडिक सहाय्यक कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहेत. तिच्याकडे या कामाचा अनुभव असलेला तसेच अभ्यासक्रम केलेली पदविका व पदवी आहे. तिने या पदासाठी अर्ज केला होता. मात्र तिची या पदासाठी निवड करण्यात आली नाही. ज्यांनी अर्ज केला नाही व लेखी परीक्षाही दिली नाही अशा उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे व अनुभव असलेल्या व कित्येक वर्षे काम करूनही तिला डावलण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.