नवसो परवारच्या सेवाभावी कार्याचे कौतुक

पद्माकर केळकर 
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

मार्च महिन्यापासून ‘कोविड-१९’मुळे लोकांची बरीच धांदल उडाली होती. पुरूष वर्गात महिना दीड महिन्यातून एकदा केशकर्तन केले जाते. मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात केश कर्तनाची आस्थापने बंद असल्याने पुरूष वर्गासमोर मोठी समस्या निर्माण झाली होती.

वाळपई: मार्च महिन्यापासून ‘कोविड-१९’मुळे लोकांची बरीच धांदल उडाली होती. पुरूष वर्गात महिना दीड महिन्यातून एकदा केशकर्तन केले जाते. मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात केश कर्तनाची आस्थापने बंद असल्याने पुरूष वर्गासमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. पण, सालेली सत्तरी येथील नवसो परवार या तरुणाने मार्च महिन्यापासून ते आजही केशकर्तन करण्याचे काम आजही रू ठेवले आहे. सद्यःस्थितीत बाजारात केशकर्तनची आस्थापने सुरू आहेत. पण, तरीही काही लोक अजूनही केशकर्तनासाठी दुकानात जात नाही. अशावेळी सालेली गावातील नवसो परवार या तरुणाकडे जाऊन लोक केस कापून घेत आहेत. गेली सात महिने नवोसोने हे काम सेवा भावनेतून कायमच ठेवले आहे. 

मार्च, एप्रिल महिन्यात केशकर्तन करणे मिळत नव्हते. अशावेळी काही लोकांनी नवसो याला केश कर्तनाची सेवा करण्याचे सुचविले. त्यानुसार नवसो परवार याने लोकांची सेवा म्हणून हे काम स्वीकारले. कोरोनाच्या धास्तीने लोकांनी बाहेर पडणे बंद केले होते. त्यातून या सामाजिक सेवेचे व्रत परवार हाती घेतले. 

नवसोकडे कोणीही केश कर्तनासाठी गेल्यास त्याला निराश न करता अगदी सुरेखपणे चांगल्या प्रकारे केशकर्तनाचे काम प्रामाणिकपणे करीत आहे. हे काम नवसो स्वत:च शिकला आहे. तो स्वत:च गुरु बनला आहे. तो बालभवन वेळगे आणि अडवई येथे मुलांना मूर्तिकला शिकवित आहे. सध्या बालभवनात ऑनलाईन पद्धतीने शिकविले जात आहे. तसेच केशकर्तन ही एक सेवाभावी वृत्ती म्हणून नवसो योगदान देत आहे. त्याला लहानपणापासून मूर्ती कलेची फारच आवड. गेल्या वर्षी ठाणे येथे झालेल्या म्हादई महोत्सवात नवसो परवारने व्यासपीठावरील रंगमंचावर बेनर म्हणून कागदापासून इको फ्रेंडली देवीची मूर्ती साकारली होती व ती प्रमुख आकर्षण ठरली होती. तसेच कला अकादमीत २०१८ साली मूर्ती कला प्रदर्शनात नवसोला उत्कृष्ट कला पुरस्कार प्राप्त झाला होता. मूर्ती कला तसेच पेंटीगचे काम तो अगदी सुंदरपणे करीत आहे.

संबंधित बातम्या