अन्‍यायकारक विधवा प्रथेविरुद्ध युरींच्‍या खासगी ठरावाची प्रशंसा

विधवा प्रथा मुक्त पहिले राज्‍य बनवूया
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

विधवा भेदभाव अन्‍यायकारक प्रथा निर्मूलनाबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्‍य विधानसभेसमोर मांडलेला खासगी सदस्य ठराव कौतुकास्‍पद आहे.

विधवा अत्याचार, अलगीकरण या अन्यायकारक प्रथा बंद करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत असे त्‍यांनी आपल्या ठरावात सुचविले आहे. तसेच त्‍याबाबत गावागावांत जनजागृती सभा घेण्‍याचे आवाहन केले आहे.

आलेमाव यांच्‍या प्रयत्‍नांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच, असे पेडणे तालुका नागरिक समिती व साहित्य मंथन सत्तरी या संस्‍थांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

Yuri Alemao
Margao Muncipality : मडगाव नगराध्‍यक्षांची एकाधिकारशाही : नगरसेवक आमोणकर

विधवा महिलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि कोणत्याही भेदभावाचा सामना न करता त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी सरकारने कायदा करण्‍याची गरज आहे. या प्रथा पतीच्या मृत्यूपासून ते तिच्या स्वत:च्या मृत्यूपर्यंत तिचे मानसिक खच्चीकरण करत तिला अपमानास्‍पद जीवन जगायला भाग पडतात.

पतीच्‍या निधनांनंतर कोणतीही चूक नसताना विधवा महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांना अमानवी विधी व अवाजवी बंधने पाळायला भाग पाडले जाते. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः धार्मिक विधी आणि कार्यक्रमांवेळी पदोपदी अपमानित केले जाते.  या सर्व प्रथा महिलांच्या मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन करतात, असे वरील संस्‍थांनी म्‍हटले आहे.

Yuri Alemao
‘अमारी बाय शी’ला दणका; खंडपीठाचा आदेश

विधवा प्रथा मुक्त पहिले राज्‍य बनवूया

राज्यात सर्वच धर्मांमध्ये पाळल्या जाणाऱ्या विधवा भेदभाव प्रथेसंबंधीचे हे वास्तव सर्व आमदारांनी आणि समाजाने समजून घेतले पाहिजे. ज्‍या पंचायतींनी या भेदभावपूर्ण विधवा पद्धतींवर बंदी घालण्याबाबत ठराव घेणाचे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे, त्‍या खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.

इतर पंचायती आणि नगरपालिकांनीही असेच ठराव घेतले पाहिजेत. विधवा प्रथांचे पूर्णपणे निर्मूलन करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य बनविण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्‍न केले पाहिजेत, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com