अधिकार नसताना ‘बायो मिथीनेशन’ला मान्यता 

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

पालिकेच्या स्टॅडिंग समितीला केवळ दहा लाख रुपयांपर्यंत विकासकामांना मान्यता देण्याचा अधिकार आहे. परंतु, मडगाव पालिकेच्या सदर समितीने बायो मिथीनेशन प्रकल्पासाठी सुमारे ४३ कोटी रुपयांच्या कामाला मान्यता दिलेली असून याप्रकरणी चौकशी करावी,

 सासष्टी : पालिकेच्या स्टॅडिंग समितीला केवळ दहा लाख रुपयांपर्यंत विकासकामांना मान्यता देण्याचा अधिकार आहे. परंतु, मडगाव पालिकेच्या सदर समितीने बायो मिथीनेशन प्रकल्पासाठी सुमारे ४३ कोटी रुपयांच्या कामाला मान्यता दिलेली असून याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे शर्मद रायतुरकर यांनी केली.

पालिका मंडळ बरखास्त होण्यास दोन दिवस असताना मुद्दामहून समितीला अधिकार नसतानाही निर्णय घेणे आणि पुढे प्रशासनाद्वारे जर हा निर्णय नामंजूर झाल्यास प्रशासनाला बोट दाखविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पालिका निवडणुकामध्ये हा विषय आम्ही मंजूर केला होता. मात्र, पुढे प्रशासनाने यास मंजुरी दिली नाही, हेच सिद्ध करण्यासाठी मान्यता दिली का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पालिकेने जन्म आणि मृत्यू दाखला देण्यासाठी विचित्र पद्धतीने शुल्कात वाढ केल्याने त्यांनी निषेध व्यक्त केला आणि मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित ही वाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली. पालिकेने कायदा अंतर्गत ३० दिवसांत दाखला देण्यासाठी २ रुपये तर तातडीने दाखला मिळविण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारणी सुरवात केली आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या