National Pickleball: अर्जुन, आदित्य, स्तव्य, त्सवीरचा लक्षवेधक खेळ

शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
Players playing a shot at the National Pickleball Tournament.
Players playing a shot at the National Pickleball Tournament.Dainik Gomantak

अर्जुन व आदित्य हे सिंग बंधू, तसेच स्तव्य व त्सवीर या भसीन बंधूंनी तिसऱ्या राष्ट्रीय मानांकन पिकलबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्पर्धा फातोर्डा येथील टेनिस कोर्टवर खेळली जात आहे.

गोवा पिकलबॉल संघटनेने अखिल भारतीय पिकलबॉल संघटना, क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने स्पर्धा घेतली आहे. अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी स्पर्धेत उद्‍घाटन केले.

Players playing a shot at the National Pickleball Tournament.
Land Grabbing Case : जमीन हडप प्रकरणातील सूत्रधार सलीम दोडामणीचा अटकपूर्व जामीन नाकारला

यावेळी अखिल भारतीय संघटनेचे सचिव चेतन सनिल, खजिनदार निखिल मथुरे, गोवा पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील, आयोजन सचिव संदीप हेबळे, खजिनदार प्रवीण शेणॉय, संयुक्त सचिव विशाल गावकर, प्रशिक्षक विनायक कामत यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्राच्या अर्जुन व आदित्य यांनी प्रेक्षणीय खेळ करताना १४ आणि १९ वर्षांखालील वयोटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. १९ वर्षांखालील एकेरीत आगेकूच राखताना महाराष्ट्राच्या स्नेहल पाटील यानेही छाप पाडली. भसीन बंधूंपैकी स्तव्य याने १४ वर्षांखालील व १९ वर्षांखालील एकेरीत, तर स्तवीर याने १९ वर्षांखालील एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पुरुषांच्या ३५ वर्षांवरील वयोगटात गोव्याच्या अमित कक्कर व आदित्य ओबेरॉय यांनी विजयी सलामी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com