सेनादलाचे धावपटू ‘रेन रन’साठी उत्साहित; 31 जुलैला शर्यत

लष्कर, नौदलाचा सहभाग, देशविदेशातील स्पर्धक धावणार
Army runners excited for Rain Run Race on July 31st
Army runners excited for Rain Run Race on July 31stDainik Gomantak

पणजी : रोटरी क्लब ऑफ पर्वरीच्या ‘रेन रन’मध्ये धावण्यास सेनादलाचे धावपटू उत्साहित आहेत. या उपक्रमाचा भाग बनणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, असे मत लष्कराच्या गोव्यातील 2 एसटीसीचे कर्नल पंकज नारायण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. येत्या 31 जुलै रोजी होणाऱ्या धावण्याच्या शर्यतीत देशविदेशातील मिळून हजारभर धावपटू असतील, तसेच लष्कर व नौदलाचे मिळून चारशेहून अधिक जण भाग घेतील.

Army runners excited for Rain Run Race on July 31st
'त्या' प्रवाशांकडून सामानाचे पैसे आकारावे : गोवा फर्स्ट

देशाच्या 75वा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लष्कर, नौदलाने शर्यतीच्या आयोजनात रोटरी क्लब ऑफ पर्वरीस सहकार्य केले आहे. गोवा पर्यटन व बीएनआय-गोवा विभाग यांचेही पुरस्कर्ते या नात्याने पाठबळ लाभत आहे. भारतीय धावपटू, तसेच बांगलादेशमधील काही धावपटू या शर्यतीत धावतील, अशी माहिती रोटरी रेन रनचे अध्यक्ष अविनाश परमार यांनी दिली.

अनुक्रमे 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर व 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत 31 रोजी बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर सुरवात होईल. या उपक्रमाद्वारे महिलांचे आरोग्य आणि शिक्षण यासाठी काम करणाऱ्या ‘प्रकाश कर्करोग मदत प्रकल्पा’स निधी उभारला जाईल. मुंबईतील ब्लेड रनर प्रदीप कुंभार आणि कर्करोगावर मात केलेल्या पणजी येथील मारियोला मथायस यावेळच्या शर्यतीत सदिच्छा दूत असतील.

पत्रकार परिषदेस परमार, कर्नल पंकज यांच्याव्यतिरिक्त रोटरी क्लब ऑफ पर्वरीच्या अध्यक्ष डॉ. संध्या कदम, रोटरी रेन रनचे सहअध्यक्ष गौरीश सावंत, भारतीय नौदलाचे कमोडर व्ही. के. गुप्ता, बीएनआय गोवा विभागीय कार्यकारी संचालक राजकुमार कामत, प्रकाश कर्करोग मदत प्रकल्पाच्या अध्यक्ष शेफान शेख यांची उपस्थिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com