मजुरांची नावेलीत स्टेडियममध्ये व्यवस्था

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम होम शेल्टर मध्ये २८ मार्चपासून लॉकडाऊनचा काळ सुरू झाल्यापासून गेले दोन महिने या मजुरांची योग्य प्रकारे जबाबदारी घेऊन त्यांना सकाळचा नाष्टा दुपारी व रात्री वेळेवर जेवणाची व्यवस्था व्यवस्थितपणे करण्यात येत आहे, अशी माहिती स्टेडियमचे व्यवस्थापक महेश रिवणकर यांनी दिली.

नावेली

येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम होम शेल्टर मध्ये २८ मार्चपासून लॉकडाऊनचा काळ सुरू झाल्यापासून गेले दोन महिने या मजुरांची योग्य प्रकारे जबाबदारी घेऊन त्यांना सकाळचा नाष्टा दुपारी व रात्री वेळेवर जेवणाची व्यवस्था व्यवस्थितपणे करण्यात येत आहे, अशी माहिती स्टेडियमचे व्यवस्थापक महेश रिवणकर यांनी दिली.
ते म्हणाले, या होम शेल्टरमध्ये ४३५ मजूर होते. त्यांना सकाळी नाष्टा व दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यामार्फत केली जात होती. त्यानंतर मडगावातील दामोदर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे विवेक नाईक यांनी पुढाकार घेऊन सकाळच्यावेळी मजुरांना नाष्टा देण्याची व्यवस्था केली. येऊन वाटप करीत व आजही करतात. कालकोंडा येथील श्रीकृष्ण देवस्थान व कालकोंडा ग्रामस्थानी मजुरांना मोफत जेवण दिले ते स्वत: येऊन आजही मजुरांना जेवण देतात. मजुरांना झोपण्यासाठी गाद्या, चादर, आंघोळीसाठी साबण, टॉवेल कपडे धुण्यासाठी साबण, कोलगेट, ब्रश अशा सर्व सुविधा देण्यात आल्या पुरुष व महिलांसाठी वेगळी व्यवस्था स्टेडियम मध्ये करण्यात आली. पंचतारांकित हॉटेल मधून चांगल्या प्रतीच्या हॉटेलमध्ये वापरण्यात येणाऱ्या नव्या कोऱ्या गाद्या,चादर टॉवेल्स मजुरांना देण्यात आले व जाताना वापरलेले चादर व टॉवेल त्यांना घेऊन जाण्यास सांगितले.
या मजुरामध्ये १ ते ५ वर्षापर्यंतची लहानमुले होती, त्यामुळे काही लोक दूध आणून देत असत मडगाव पालिकेच्या माजी नगराध्यक्ष डॉ. बबिताआंगले प्रभूदेसाई यांनी लहानमुलांसाठी दुधाची व्यवस्था केली.
आजही बिहार, झारखंड, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे दीड हजार मजूर शेल्टर होममध्ये आहेत. या ठिकाणी मजुरांसाठी २० बायो टॉयलेट तसेच स्टेडियमची २० टॉयलेट वापरण्यात देण्यात आली होती.मडगाव पालिका २० बायोटॉयलेट दिवसातून तिनवेळा सफाई करून तसेच कचरा दररोज गोळा करीत आहे. पाण्याची २४ तास व्यवस्था त्या शिवाय पाण्याचा टँकर भरून ठेवण्यात येत आहे. मजुरांना आंघोळीसाठी शॉवर देखील बसवण्यात आले. रिवणकर याच्या नेतृत्वाखाली एसएजीचे ३२ कर्मचारी आळीपाळीने काम करीत आहेत. मजुरांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी अजित रॉय, अधिकारी अजित पंचवाडकर तसेच सर्व अधिकाऱ्यांकडून चांगले सहकार्य लाभल्याचे रिवणकर यांनी सांगितले.
आणखीन आठ दिवसात सर्व मजूर आपापल्या गावाला निघून जातील, परंतु यात सुमारे आठ ते दहाजण असे आहेत, ज्याचे गावात कोणीच नाही, असे काही मजूर आपल्याला सांगतात, असे रिवणकर यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या