‘व्हीजनरीज’च्या संचालक मंडळाला अटक करा

गुंतवणूकदारांची मागणी; जप्त केलेला पासपोर्ट सोडवण्यास विरोध करणारा न्यायालयात अर्ज
Arrest board of directors of Visionaries
Arrest board of directors of VisionariesDainik Gomantak

मडगाव: 50 कोटींची अफरातफर झाल्याचा वहीम असणाऱ्या व्हीजनरीज पतसंस्थेच्या अध्यक्ष ग्रेसी व्हाझ यांच्यासह सर्व संचालक मंडळाला त्वरित अटक करावी आणि गुंतवणूकदारांचे बुडालेले पैसे सरकारने वसूल करून घ्यावेत, अशी मागणी या पतसंस्थेच्या गुंतवणूकदारांनी केली आहे. कारवाई झाली नाही तर स्थानिक आमदारांना येत्या निवडणुकीत पाडण्यासाठी आम्ही काम करू असा इशारा मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

Arrest board of directors of Visionaries
गोवा अग्निशमन दलात आमूलाग्र बदल

व्हाझ यांचा कोलवा पोलिसांनी जप्त केलेला पासपोर्ट सोडवावा यासाठी व्हाझ यांनी केलेल्या मागणीवर आज न्यायालयात अंतिम युक्तिवाद होता. व्हाझ यांच्यावर आर्थिक गुन्हेगारी शाखेत एफआयआर दाखल झालेला असल्याने त्यांचा पासपोर्ट सोडला जाऊ नये यासाठी या गुंतवणूकदारांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली असून या अर्जावर पुढील सुनावणीत युक्तिवाद होणार आहे.

Arrest board of directors of Visionaries
आंदोलक शिक्षकाच्या प्रकृतीत बिघाड! गोवा सरकारला इशारा

कोलवा, माजोर्डा, लोटली व रामनगरी या चार ठिकाणी गुंतवणूक केलेले सुमारे 4 हजार गुंतवणूकदार सध्या अडचणीत आहेत. या प्रकरणी पोलिसही संथगतीने तपास करत आहेत. येत्या 20 दिवसांत या तपासात गती आणण्यास जर स्थानिक आमदार फिलिप नेरी रोड्रिंक्स, चर्चिल आलेमाव, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि बाबाशान डीसा यांनी प्रयत्न केले नाहीत तर येनाऱ्या निवडणुकीत फसलेले सर्व गुंतवणूकदार या चारही आमदारांच्या विरोधात काम करतील, असा इशारा यावेळी गुंतवणूकदारांच्या समितीचे निमंत्रक मायरॉन फर्नांडिस यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com