'शांततावादी निदर्शकांना अटक करणं लोकशाही हक्कांवर हल्ला'

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

विमानतळ प्रकल्पाच्या रस्त्यासाठी भू-संपादन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या जमीन पाहणीस विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना अटक करणे ही सरकारची हुकूमशाही आहे.

पणजी: मोप येथील विमानतळ प्रकल्पाच्या रस्त्यासाठी भू-संपादन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या जमीन पाहणीस विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना अटक करणे ही सरकारची हुकूमशाही आहे, असे मत आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक राहूल म्हांबरे यांनी व्यक्त केले. शांततावादी निदर्शकांना अटक करणे हा लोकशाही हक्कांवर हल्ला आहे, असेही त्यांनी नमूद केले. आंदोलकांना म्हापसा पोलिस ठाण्यात आणल्याचे समजताच त्यांनी आपचे नेते अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर आणि पुंडलिक धारगळकर यांच्यासह म्हापसा पोलिस ठाण्यास भेट देऊन आंदोलकांवर कोणते गुन्हे दाखल केली याची माहिती घेतली. तेथेच त्यांनी आंदोलकांना पाठींबाही व्यक्त केला.

'महामार्ग अन्यत्र नेता येणार नाही' मुख्य़मंत्री प्रमोद सावंतांनी केलं...

त्यांनी सांगितले, या रस्त्यासाठी आणखीन जमीन संपादनास लोकांचा विरोध आहे. याआधीच रस्त्यासाठी जमीन संपादीत करण्यात आली आहे. त्यामुळे शेती असलेली जमीन पुन्हा घेऊ नका एवढेच लोकांचे म्हणणे आहे. लोक गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत निषेध करत आहेत. त्याच विषयावर विविध मंत्र्यांनी मोप व पेडणेच्या लोकांना आश्वासन दिले, पण त्यांचे प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे लोक आज रस्त्यावर उतरले आहेत. भूसंपादनामुळे अनेक वर्षांपासूनची त्यांची घरे आणि उपजीविकेसाठीची जमीन हातची जाईल. मेळावली येथे पोलिस यंत्रणेचा वापर आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारने केला. त्याच पद्धतीने आजही या आंंदोलकांसोबत सरकार वागले आहे. ज्येष्ठ नागरीकही पोलिस कारवाईपासून आज वाचू शकलेले नाहीत.

संबंधित बातम्या