‘त्या’ हल्लेखोरांना त्वरित अटक करा; गिरोडकर

जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत पोलिस स्‍टेशन समोर ठाण मांडून बसू.
‘त्या’ हल्लेखोरांना त्वरित अटक करा; गिरोडकर
Police StationDainik Gomantak

धारबांदोडा : बोट्टर - साकोर्डा (Boater-Saccorda) येथील सूर्यकांत गिरोडकर यांच्यावर कोयत्याने वार केलेल्या संशयितांना अजूनपर्यंत अटक न केल्याने संतप्त गिरोडकर कुटुंबीयांनी शनिवारी कुळे पोलिस स्थानकावर धडक देऊन संशयितांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही. तोपर्यंत पोलिस स्‍टेशन (Police Station) समोर ठाण मांडून बसण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

गुरुवारी संध्याकाळी बोट्टर येथे जमिनीवरून झालेल्या वादातून सूर्यकांत गिरोडकर यांच्यावर संशयित वासुदेव कुडसेकर व रवींद्र कुडसेकर या पिता पुत्रांनी गिरोडकर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला होता. जखमी गिरोडकर यांना उपचारासाठी गोमॅकोत दाखल केले होते. त्यानंतर त्यांना पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.

संशयीत आरोपींना पोलिसांकडून अभय देण्याचा प्रयत्न होत असून संशयितांनी सूर्यकांत यांना जिवंत मारण्याची धमकी दिल्याचे गिरोडकर कुटुंबीयांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताचा शोध सुरू असून पोलिस त्यांच्या मागावर आहे. प्रयत्न करूनही संशयित आरोपी सापडत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com