विठ्ठलापूर शाळेत शारदोत्सवाला प्रारंभ

चक्क बैलगाडीतून सरस्वतीचे आगमन
विठ्ठलापूर शाळेत शारदोत्सवाला प्रारंभ
विठ्ठलापूर-कारापूर बैलगाडीतून सरस्वतीचे आगमन (Goa)Dainik Gomantak

Goa: विठ्ठलापूर-कारापूर येथील सरकारी प्राथमिक शाळेत (Govt Primary School) आज बुधवार पासून शारदोत्सवाला (Shardotsav) उत्साहात प्रारंभ झाला असून, विद्येची देवी अर्थातच सरस्वती (Mother Sarswati) मूर्तीचे चक्क बैलगाडीतून (Bullock Cart) शाळेत आगमन झाले.

विठ्ठलापूर-कारापूर बैलगाडीतून सरस्वतीचे आगमन (Goa)
राज्यपाल निधीतून गरजूंना मदत करण्याची राज्यपालांची घोषणा

विठ्ठलापूर येथील श्री. पुजारी यांच्या चित्रशाळेतून सरस्वती देवीची मूर्ती बैलगाडीतून विठ्ठलापूर येथील शाळेपर्यंत आणण्यात आली. सरस्वती देवीचे वाहन असलेल्या राजहंसाच्या प्रतिकृतीची सजावटही करण्यात आली होती. सरस्वतीची मूर्ती आणण्यासाठी हरवळे येथील कृष्णनाथ ठाणेकर यांची बैलगाडी आणण्यात आली होती.

विठ्ठलापूर-कारापूर बैलगाडीतून सरस्वतीचे आगमन (Goa)
कोरगाव येथे हँडलूम केंद्र;पाहा व्हिडिओ

बैलगाडी मिरवणुकीत शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष वर्धमान शेंदुरे, श्री. पंचवाडकर आदी पालक सहभागी झाले होते. सरस्वती मूर्तीचे शाळेत आगमन होताच, मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. बैलगाडीतून सरस्वतीची मूर्ती शाळेत आणण्याची ही संकल्पना प्रथमच शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या कल्पनेतून पुढे आली होती. दरम्यान, गुरुवारी (ता. 14) सायंकाळी आरती झाल्यानंतर सरस्वती मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.