गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर उभारणार ‘आर्ट हब''

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

हैदराबाद येथील चित्रपट निर्माता कृष्णा राव यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर ‘आर्ट हब'' उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी ३० एकर क्षेत्र खरेदी केले आहे. 

पणजी : हैदराबाद येथील चित्रपट निर्माता कृष्णा राव यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर ‘आर्ट हब'' उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी ३० एकर क्षेत्र खरेदी केले आहे. 

सध्या कृष्णा राव यांनी राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर ‘कोरोना व्हायरस'' या चित्रपटासाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. दोडामार्ग येथील हा प्रकल्प कृष्णा राव यांचा ‘स्वप्नवत'' प्रकल्प आहे. या आर्ट हबच्या माध्यमांतून ललित कलांसाठी आणि एक समुदाय तयार करण्यासाठी सर्व स्वतंत्र कलाकारांना एका छाताखाली आणण्याची त्यांची इच्छा आहे.

 
आर्ट हब हा प्रकल्प सहभागीं होणाऱ्यांना जास्तीत जास्त जागतिक प्रदर्शनाची हमी देईल आणि एक बाजारपेठ देखील तयार करेल, जिथे कलाकार आपले काम प्रदर्शित करू आणि विकूही शकणार आहेत. कृष्णा राव हे इंडी बर्डस्‌‘चे संस्थापक आहेत. ‘इंडी बर्डस्‌‘ हा वेब मालिका तसेच कलेतील उपक्रमांकरिता महत्त्वाचे व्यासपीठ आहे. 

‘इंडी बर्डस्‌‘ हा एक आनंददायक प्रवास होता. आम्ही कल्पनांसाठी निधी वाढवून ठोस आकार देण्यास मदत केली आहे. आतापर्यंत ‘अ लव्ह लेटर टू कॅम्प'', माँटेज सॉंग आणि ‘कथा विश्‍लेष''सारख्या प्रकल्पांना अर्थसहाय्य ‘इंडी बर्डस्‌‘ संस्थेने केले आहे.  

आर्ट हबमध्ये मातीची भांडी, चित्रकला आणि शिल्पकला यासारख्या कलेच्या विविध शाखांमध्ये निवासी प्रशिक्षण मिळेल. गोव्याच्या सीमेवर निसर्गरम्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या कॉटेजमुळे तेथील कलावंतांना प्रेरणा मिळविण्यासाठी जास्त दूर पाहावे लागत नाही. तथापि, निधीची कमतरता प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरणार आहे. 

आतापर्यंत या प्रकल्पाला माझ्याकडून माझी पुंजी गुंतविलेली आहे. त्या जागेसाठी आमच्यासाठी ४० कोटी रुपये खर्च केला आहे आणि माझे स्वप्न प्रकल्प साकारण्यासाठी आता मी गुंतवणूकदारांचा शोध घेत आहे, असे कृष्णा राव यांनी एका इंग्रजी दैनिकाला सांगितले.

संबंधित बातम्या