रबरबँड व हेअर बँड तयार करण्याची कला

रबरबँड व हेअर बँड तयार करण्याची कला
रबरबँड व हेअर बँड तयार करण्याची कला

कोरोना महारोग आला आणि कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या हे जरी खरे असले तरी यामुळेच कित्येकांचे भले होईल हे खोटे नाही. वाईट परिस्थिती ओढावल्यामुळे माणूस काही तरी नवीन शिकतो आणि तो यशवंत होतो. गोव्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे या विवंचनेत राहणे योग्य नाही. तीन दशकानंतर नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा झाली त्यामुळे पुढील काळात बेरोजगारीचा प्रश्‍न काही प्रमाणात अवश्‍य सुटेल परंतु जर आपण धंदा केला असता तर परिस्थिती बदलली असती अशी कल्पना करणे तशी चुकीची नाही.

जर आपण नोकरी सांभाळून घरच्या घरी एखादा धंदा सुरू करण्याचा विचार करीत असाल तर रबरबँड आणि हेअरबँड बनविण्याचा धंदा फायदेशीर आहे. मुलेच कशाला, मुली किंवा महिलासुध्दा हा धंदा घरातच बसून करू शकतात. हा धंदा करण्यासाठी फक्त एकच छोटेसे मशीन विकत घ्यावे लागते. ते घरातील एका कोपऱ्यात  ठेवता येते. कपडे शिवायचे मशीन चालवायला डोके लागते, मेहनत करावी लागते. हे मशीन एकाच हाताने चालवता येते.

उसाचा रस काढण्यासाठी जे मशीन असते तशाच प्रकारचे  हे मशीन असते, परंतु याची रुंदी मात्र सव्वामीटर असते. उसाच्या मशिनात एकाच बरोबर दोन ऊस घालता येतात, परंतु या मशिनात एकाच बरोबर दोन इंच रुंदीचे एक रबर पाईप पकडल्यास बावीस पाईपे घालता येतात आणि पाच मिनिटात एक लाखापेक्षा जास्तच रबरबँड कापता येतात. एक इंचात दहा किंवा पाच रबरबँड कापण्याची अॅडजस्टमेंट मात्र मशीन चालू करण्यापूर्वी करावी लागते.

हा रबरचा पाईप अर्थात कच्चा माल प्रति किलो २००-२५० रुपयेप्रमाणे विकला जातो आणि रबरबँंड पण किलोप्रमाणेच विकले जातात. पाव किलोच्या छोट्या रबरबँडच्या पाकिटात किती हजार रबरबँड असतात ते  अजूनपर्यंत लहान मुलानीही मोजले नसतील. रबरबँड अत्यंत उपयोगी वस्तू असली तरी  ती ज्या किमतीत मिळते त्यापेक्षा जास्तच किंमत द्यायला लहान मुलेही तयार असतात.

रबरबँडच्या कच्च्या मालाची किंमत कचऱ्याच्या किमतीपेक्षा कमीच असते ही माहिती रबरबँडचे उत्पादन करणाऱ्याला असते. रबरबँड बनविण्याचा धंदा करणारे जे कमवतात त्याच्यापेक्षा जास्त आठ तास खुर्ची गरम करणारे कारकून कदापि कमविणार नाहीत.
अत्यंत फायदेशीर असा हा धंदा साधारण माणसाच्या नजरेत भरत  नाही. रबरबँड म्हणजे किरकोळ चीज वाटत असल्यामुळेच हा धंदा करणाऱ्याच्या मेहनतीचे चीज होते. एक रबरबँड उत्पादक हजारो व्यापाऱ्यांच्या आवश्‍यकतेची गरज भागवतो. ह्या धंद्यात स्पर्धा नाही. कारण ह्या धंद्यातील सिक्रेट कोणालाही माहीत नाहीत.

रबरबँडचे प्रकार जसे वाढत गेलेत तसे उपयोगही वाढत आहेत. अमेरिकेत सर्वात जास्त रबरबँडचा उपयोग केला जातो.
पोस्ट आॅफिसात पत्राचे गठ्ठे बांधण्यासाठी रबरबँड वापरले जातात, तसेच रबरबँड वर्तमानपत्रांचे गठ्ठे बांधण्यास वापरले जातात. पुष्पगुच्छ बनविणारे हेच रबरबँड वापरतात. कॉलिफ्लावरचे पीक काढणाऱ्यांना ते बांधण्यासाठी रबरबँड लागतात. रबर हा झाडापासून मिळतो तीसुध्दा विषववृत्त क्षेत्रात.

१८४३ साली थॉमस हँकोवू यांनी रबरबँडचा शोध लावला. नवीन जगतातील भारतीयानी बनविलेली रबरची बाटली कापून त्याचा रबरबँड बनविला. त्याचा उपयोग फक्त गमबुट बनविण्यासाठी किंवा कमरपट्टा बनविण्यासाठी व्हायचा. नंतर हळूहळू रबरबँड बनविणाऱ्यानाच हेअरबँड बनविण्याची कल्पना सुचली. आता रबरबँडपेक्षा हेअरबँडला जास्त भाव मिळतो.

रबरबँड बनविणाऱ्या मशीनवरच आता हेअरबँड सहज बनविले जातात. हेअरबँडचेही प्रकार आता वाढत गेलेत. रबराचे भाव म्हणण्यासारखे वाढत नसून त्याची कमतरताही भासत नसते. रबरबँड बनविण्यासाठी वेगवेगळ्या व्यासाच्या नळ्यांच्या स्वरुपात जसा कच्चा माल मिळतो त्याच स्वरुपात हेअर-बँड बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध असतो. याच मशिनच्या मदतीने ते बनविले जातात.

हे मशीन चालवायला अत्यंत सोपे असल्यामुळे ते चालविण्यासाठी खास प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. माल तयार झाला की वजनाप्रमाणे पॅक करण्याची मात्र मेहनत घ्यावी लागते. स्टेशनरी दुकाने. किराणा दुकानात किंवा पुस्तकालयात हे रबरबँड सहज खपतात. हेअर-बँडना कॉस्मेटिक दुकानातून मागणी असते.

ह्या मशिनची किंमत ७०,००० रुपये आहे. २५ टक्के अगोदर दिल्यावर ते घरपोच केले जाते. १२५ किलो वजनाचे मशीन कुरियरने पाठवायची व्यवस्था कंपनी करते, परंतु ती रक्कम आपल्याला द्यावी लागते. भिलवाडा, राजस्थान येथील एस. के. एंटरप्रायज कंपनीने हे मशीन बनविलेले आहे. 

सविस्तर माहितीसाठी मोबाईल क्र. ९९२९१५७१४२.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com