युक्रेनमधील भारतीयांना ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ तर्फे मदत
Sri Sri Ravi Shankar Dainik Gomantak

युक्रेनमधील भारतीयांना ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ तर्फे मदत

रशियन आक्रमणाने त्रस्त झालेल्या युक्रेनमधील हजारो लोकांसाठी श्री रवी शंकर हे स्वयंसेवक देवदूत ठरले

मडगाव: विश्र्व अध्यात्मिक गुरु श्रीश्रीश्री रवी शंकर यांच्या प्रेरणेने भारून जाऊन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी माणुसकी जपत युक्रेन व पोलंड येथील भारतीयांना मदतीचा हात दिला आहे. तेथील निर्वासीतांना अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवक झटत आहेत. हंगेरी, पोलंड, रोमानिया, स्लोवाकिया, बल्गेरिया आदी देशांत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांचे प्रचंड मोठे जाळे आहे. दिवस-रात्र हे स्वयंसेवक सेवाकार्य करीत आहेत. रशियन आक्रमणाने त्रस्त झालेल्या युक्रेनमधील हजारो लोकांसाठी हे स्वयंसेवक देवदूत ठरले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यांना भारतात येण्यासाठी स्वयंसेवक मदत करीत आहेत.


 Sri Sri Ravi Shankar
गोव्यात 'KTCL'चा नवा उपक्रम; दिव्यांग लोकांचा प्रवास होणार सुखद

श्रीश्रीश्री रविशंकर यांनी स्वतः अनेक पिडीत लोकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना धीर दिला आणि त्यांच्या व्यथा समजून घेऊन तेथे आपले विश्र्वासू स्वयंसेवक पाठविले. पीडितांनी धीर सोडू नये असे आवाहन श्रीश्रीश्री रविशंकर यांनी केले आहे. त्यांनी पोलंडमध्ये 500 खाटांचे इस्पितळ आणि हजारो पीडितांसाठी निवारा उभारला आहे.

युक्रेनमध्ये किंवा नजिकच्या देशांमध्ये जे कोणी गोमंतकीय किंवा भारतातील इतर राज्यातील नागरिक अडकून पडले असतील तर त्यांच्या मदतीसाठी 31631975328या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे कळविण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com