‘म्युझियम ऑफ गोवा’तर्फे बुधवापासून कला कार्यशाळा

Dainik gomantak
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

मुलांमधील उपजत कला गुण शोधण्यासाठी म्युझियम ऑफ गोवाने आघाडीचे कलाकार सुबोध केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी कला कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा दृष्यमान (व्हिजुअल) कलेवर आधारीत आहे. 

फातोर्डा
मुलांमधील उपजत कला गुण शोधण्यासाठी म्युझियम ऑफ गोवाने आघाडीचे कलाकार सुबोध केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी कला कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा दृष्यमान (व्हिजुअल) कलेवर आधारीत आहे. 
या कार्यक्रमाअंतर्गत केरकर मुलांना जागतिक चित्रकला, रंगकाम तसेच शिल्पकला, डिजिटल आर्ट याच्या प्रवासाबद्दल माहिती देतील. शिवाय ते प्रात्यक्षिके करुन दाखवतील. तसेच शंख, शिपल्या, दगड, गवत व गारगोटीपासून वस्तू तयार करण्याची कलापण शिकवली जाणार आहे. 
एका तुकडीत केवळ १२ मुलांना घेतले जाईल. ही कार्यशाळा प्रत्येकी दोन तासांच्या आठ सत्रांमध्ये विभागली गेली आहे. दर बुधवारी व शुक्रवारी या कार्यशाळेचे आयोजन केले जाईल. पहिली तुकडी १९ ऑगस्टपासून सुरू होईल. ही कार्यशाळा १६ वर्षांवरील मुलांसाठी सिमित आहे. अधिक माहितीसाठी ७७२२०८९६६६ या क्रमांकावर किंवा info.museumofgoa@gmail.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या

Tags