पेडणे येथे २० लाखांचा ड्रग्ज जप्त

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

गांजाच्या उत्पादनासाठी घरामध्ये कृत्रिम वातावरणाची निर्मिती करण्यात आली होती. पेडणे पोलिसांनी गेल्या दोन महिन्यात गांजा व कॅनबिस रोपेप्रकरणी नोंद केलेले हे सहावे प्रकरण आहे.

 
पणजी - पेडणे पोलिसांनी कोरगाव - पेडणे येथे एका मुंबईच्या तरुणासह दोघांना २० लाखांच्या ड्रग्जप्रकरणी अटक केली. अटक केलेल्या संशयितांची नावे लार्सन रिचर्ड (बांद्रा - मुंबई) व सांतान डिसोझा (कोरगाव - पेडणे) अशी आहेत.

पोलिसांनी कोरगाव येथील एका घरामध्ये छापा टाकला त्यावेळी ८,६०० रुपयांचा गांजा, ५ लाख ६० लाखांचा चरस तसेच १४ लाख रुपये किंमत असलेली कॅनबिस रोपे जप्त केली. या गांजाच्या उत्पादनासाठी घरामध्ये कृत्रिम वातावरणाची निर्मिती करण्यात आली होती. पेडणे पोलिसांनी गेल्या दोन महिन्यात गांजा व कॅनबिस रोपेप्रकरणी नोंद केलेले हे सहावे प्रकरण आहे.

संबंधित बातम्या