Goa: ‘आप’च्या रॅलीत युवकांचा वरचष्मा

वाढती बेकारी ही गोव्याची आजची सर्वात मोठी चिंता असून सरकारकडे ती सोडविण्यासाठी कोणतीच योजना नाही. भाजप (BJP) व काँग्रेस (Congress) ती समस्या सोडवू शकत नाहीत याची तरुणांनाही जाणीव आहे.
Goa: ‘आप’च्या रॅलीत युवकांचा वरचष्मा
'आप' (Aap) रॅलीत प्रामुख्याने युवकांचा (Youth) वरचष्मा दिसून आला.Dainik gomantak

मडगाव: आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) शुक्रवारी नावेली मतदारसंघात रॅली (Rally) काढून एक प्रकारे आगामी निवडणुकीच्या तोंडावर शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीत प्रामुख्याने युवकांचा (Youth) वरचष्मा दिसून आला.

पक्षाच्या उपाध्यक्षा तथा नावेलीतील संभाव्य उमेदवार गणल्या जाणाऱ्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो (Pratima Kutinho)यांनी बावटा दाखवून या रॅलीस सुरवात केली. तसेच सर्वात पुढे असलेल्या दुचाकीवर स्वार होऊन रॅलीचे नेतृत्वही केले. ही रॅली नावेली मतदारसंघातील सर्व भागांत तसेच गावात फिरली व तिने आम आदमी पक्षाचे वारे मतदारसंघाच्या काना कोपऱ्यात पोचविले. रॅलीत असंख्य दुचाकी सहभागी झाल्या होत्या व युवकांनी पक्षाच्या टोप्या घातल्या होत्या. तसेच शेले परिधान केले होते.

'आप' (Aap) रॅलीत प्रामुख्याने युवकांचा (Youth) वरचष्मा दिसून आला.
Goa Politics: ‘मगो’ आणि ‘आप’ची होणार युती?

रॅली सुरु करण्यापूर्वी प्रसार माध्यमांसमोर बोलताना प्रतिमा कुतिन्हो यांनी या रॅलीव्दारे गोव्यातील बेरोजगारीवर प्रकाशझोत टाकला जाईल, असे सांगितले. वाढती बेकारी ही गोव्याची आजची सर्वात मोठी चिंता असून सरकारकडे ती सोडविण्यासाठी कोणतीच योजना नाही. भाजप व काँग्रेस ती समस्या सोडवू शकत नाहीत याची तरुणांनाही जाणीव आहे व म्हणून ते ‘आप’कडे आकर्षित झाले आहेत. कारण अरविंद केजरीवाल यांनी ती समस्या दिल्लीत सोडवून दाखवली आहे. त्यांनी या वेळी लुईझिन फालेरो यांनाही लक्ष्य केले व त्यांनी आमदारकी सोडून नावेली मतदारसंघाला पोरके केल्याचा ठपका ठेवला.

Related Stories

No stories found.