घरोघरी जाऊन प्रचार करा: अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
घरोघरी जाऊन प्रचार करा: अरविंद केजरीवाल
Arvind Kejriwal Dainik Gomantak

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. यावेळेस त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक प्रचार (Election Campaign) हा देशाची सेवा करण्याची एक संधी असल्याचे ते म्हणाले. (Arvind Kejriwal asks party workers to do door to door campaign)

Arvind Kejriwal
गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या; आमदार दयानंद सोपटे

पुढील एक महिना देशाच्या नावावर करा. तुम्ही (कार्यकर्त्यांनी) घरोघरी जाऊन लोकांना या कामांबद्दल माहिती द्या. त्यांची विचारपूस करा. त्यांची मदत करा. सोशल मीडियाचा (Social Media) उपयोग करून लोकांपर्यंत पोहचा, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, त्यांनी इतर राजकीय पक्षांवर निशाणा साधला. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, आप सत्ता मिळवण्यासाठी नाही तर परिवर्तन घडवण्यसाठी निवडणूक लढवत आहे. आपल्याला देशात सुरू असलेली भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे. केजरीवाल यांनी इतर राजकीय पक्षांवर भाष्य केले. ते म्हणाले, मागील 70 वर्षात जनतेने अनेक राजकीय पक्षांना संधी दिली. मात्र, त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला.

Arvind Kejriwal
Goa Crime: वाडे-शांतीनगर रेल्वे पुलाखाली आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

केजरीवाल यांनी दिल्ली सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला. सरकारी शाळेत केलेले सुधार त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, दिल्ली सरकारने लोकांमध्ये विश्वास जागा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com