आज केजरीवाल गोव्यातील कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत आप पक्ष उर्वरीत पक्षांसाठी आव्हान बनले आहे.
आज केजरीवाल गोव्यातील कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार
AAPDainik Gomantak

पणजी: 'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दुपारी 4 वाजता आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत आप पक्ष उर्वरीत पक्षांसाठी आव्हान बनले आहे. (Arvind Kejriwal to address party workers in Goa though video conferencing)

AAP
वास्कोत 'जागो ग्राहक जागो' अंतर्गत जागरूकता कार्यक्रम

मागील काही दिवसात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गोव्यात अनेक सभा आयोजित केल्या आहेत. 'आप'ने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. 'आप'च्या गोव्यातील नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. परिणामी सर्वच राजकीय पक्षांनी हालचाल सुरू केली आहे. rराज्यात निवडणूक (Election) प्रचाराने जोर धरला आहे. आतापर्यंत 'आप'ने (AAP) उमेदवारांच्या दोन यादी जाहीर केल्या आहेत. निवडणूक प्रचारासाठी व पक्ष बांधणीसाठी अरविंद केजरीवाल गोव्याला भेट देण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com