अरविंद केजरीवाल गुरुवारी गोवा दौऱ्यावर, राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता

दिल्लीत आप सरकारने (AAP Govt) केलेल्या चांगल्या कामामुळे गोव्यातील लोक आप'कडे आकर्षित होत असून स्वच्छ चरित्र्याच्या नेत्यांनाच आपमध्ये प्रवेश दिला जाईल
अरविंद केजरीवाल गुरुवारी गोवा दौऱ्यावर, राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता
Arvind KejriwalDainik Gomantak

पणजी: दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (AAP) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे परवा ता.७ ऑक्टोबर रोजी एका दिवसासाठी गोव्यात येत असून गोव्यातील त्यांच्या या भेटीत अनेक राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून कॉंग्रेसचे युवा आमदार आलेक्स रेजीनाल्ड (Congress MLA Aleixo Reginaldo Lourenco) यांना आपमध्ये प्रवेश देण्यासाठीच केजरीवाल गोव्यात येत असल्याचे कळते. तसे झाल्यास ती एक मोठी राजकीय उलथापालथ ठरणार आहे. आपचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांनी आज पणजी येथे आपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अरविंद केरजीवाल हे गोव्यात एका दिवसासाठी येत असल्याचे सांगून उद्या त्यांचा सविस्तर कार्यक्रम जाहिर होणार असल्याचे सांगितले.

Arvind Kejriwal
पी चिदंबरम पुन्हा गोवा दौऱ्यावर

आमदार रेजीनाल्ड यांच्या आपमधील प्रवेशाबाबत मात्र थांबा आणि पहा. आपण त्याबाबत काही सांगू शकत नाही, असे नाईक म्हणाले. दिल्लीत आप सरकारने केलेल्या चांगल्या कामामुळे गोव्यातील लोक आप'कडे आकर्षीत होत असल्याचे सांगून स्वच्छ चरित्र्याच्या नेत्यांना आपमध्ये प्रवेश देण्यात येत असल्याचे विधान नाईक यांनी केले. माजी मंत्री महादेव नाईक यांना कोणत्या निकषावर आप मध्ये प्रवेश दिला? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता. त्‍यांच्यावर काही आरोप असल्याचे आपणास तरी माहित नाही. आणि असलेच तर ते राजकीय सुडापोटी केलेले असतील. असे सांगून वाल्मीकी नाईक यांनी वेळ मारून नेली.

Arvind Kejriwal
भाजप च्या पणजी मंडळातर्फे आज आयुर्वेदीक शिबीराचे आयोजन

डॉ. सॅम्युअल अरावत्तीगी यांचा आपमध्ये प्रवेश

वेळ्ळी मतदारसंघातील चिंचणी येथील डॉक्टर डॉ. सॅम्युअल अरावत्तीगी यांनी आज आपमध्ये प्रवेश केला. आपचे प्रवक्ते वाल्मीकी नाईक, क्रुझ सिल्वा व जेरसन गोम्स यांनी त्यांचे स्वागत केले. आपण निवडणू लढवणार नाही. दिल्लीतील आपच्या सरकारचे काम पाहून आपण प्रभावीत झालो व आपमध्ये प्रवेश करत आहे. असे सांगत आपण राजकारणी नसल्याचे डॉ. अरावत्तीगी यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.