गोवा पोलीस महासंचालकपदी आय. डी. शुक्ला यांची नियुक्ती

केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव बी. जी. कृष्णन (B. G. Krishnan) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ते गोव्यात गोवा पोलीस महासंचालकपदी आरुढ होणार आहे.
गोवा पोलीस महासंचालकपदी आय. डी. शुक्ला यांची नियुक्ती
Director-General I.D. ShuklaDainik Gomantak

गोवा पोलीस दलाच्या सेवेतून भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) दाखल झालेले आणि एग्मू कॅडरच्या 1995 बॅचचे अधिकारी इंद्र देव शुक्ला अर्थात आय. डी. शुक्ला (Director-General I.D. Shukla) यांची गोवा पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यानुसार आज त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले. केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव बी. जी. कृष्णन (B. G. Krishnan) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ते गोव्यात गोवा पोलीस महासंचालकपदी आरुढ होणार आहे. विद्यमान महासंचालक मुकेश कुमार मीना (Mukesh Kumar Meena) यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे.

6 जून 1988 रोजी गोवा पोलीस सेवेत थेट उपअधीक्षकपदी नियुक्ती राज्यात बदली होऊन आलेले पोलीस महासंचालक शुक्ला यांची 6 जून 1988 रोजी केंद्र सरकारच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाने गोवा पोलीस सेवेत थेट उपअधीक्षकपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांना नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले. नंतर त्यांनी म्हापसा पोलीस विभागीय अधिकारी म्हणून ताबा घेतला. 7 फेब्रुवारी 1997 रोजी त्यांना अधीक्षकपदी बढती देण्यात आली. त्यावेळी त्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी प्रथम नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी उत्तर गोवा, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या अधीक्षक पदावर सेवा बजावली आहे.

 Director-General I.D. Shukla
गोव्यातील मच्छिमारांचे लाडके नेते नरेंद्र. आर पाटील यांचे निधन

14 जून 200 रोजी आयपीएस 1995 बॅचचे अधिकारी म्हणून नियुक्ती

14 जून 2000 रोजी त्यांना भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) 1995 बॅचचे अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी काही काळ दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची गोव्यातून बदली करण्यात आली. गोव्यात बदली होण्याअगोदर शुक्ला यांनी दिल्लीत सुरक्षा विभागाचे विशेष आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी विज्ञान शाखेची आणि कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते पुढील वर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी निवृत्त होणार आहे.

दरम्यान आय. डी. शुक्ला यांचे आज संध्याकाळी गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले.यावेळी त्यांच्या स्वागतासाठी पोलिस दल उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, गोवा हे माझे गृहस्थान आहे.मी माझी सेवा गोव्यातील जनतेसाठी तसेच पोलीस दलासाठी करणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com