Online Fraud: ‘गुगल पे’वर 1 रुपया पाठवण्यास सांगून तब्बल 99 हजारांना लुटले

नाईक यांच्या खात्यातून दोनवेळा 25500 तर आणखी एक वेळा 48 हजार असे एकूण 99 हजार रूपये वळते केले.
Online Fraud
Online FraudDainik Gomantak

‘तुमचा फ्लॅट मला भाड्याने घ्यायचा आहे. पुढील व्यवहार करण्यासाठी मी दिलेल्या नंबरवर गुगल पेद्वारे फक्त एक रुपया पाठवा’ असे सांगून मडगाव येथील एकाला ठकसेनाने 99हजारांचा ऑनलाईन गंडा घातला.

आके बायश येथील सुरेंद्र नाईक यांनी आज मडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 8 फेब्रुवारी रोजी नाईक यांना संदीप शर्मा नामक व्यक्तीने तुमच्याकडे भाड्याने द्यायचा फ्लॅट आहे का? अशी चौकशी केली. तसेच त्यांना गुगल पेवरून आपल्याला फक्त एक रुपया पाठवा असे सांगून एक नंबर दिला.

त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून नाईक यांनी 1 रुपया त्या नंबरवर पाठविला. मात्र, काही वेळातच त्यांच्या खात्यातून दोनवेळा 25500 तर आणखी एक वेळा 48 हजार असे एकूण 99 हजार रूपये वळते केले. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

नावेलीच्या युवतीला 1.75 लाखांचा गंडा

सोशल मीडियाद्वारे मैत्री साधून विश्वास संपादन करत युकेमध्ये कारकुनाची नोकरी मिळवून देतो, असे सांगून ब्रिटीश युवकाने नावेली येथील युवतीला १.७५ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

संशयित ब्रिटीश युवकाचे नाव विलियम जॅक्सन असे असून त्याच्याविरोधात रातवाडो नावेली येथील म्युरियल वाझ हिने तक्रार नोंदवली आहे. मडगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

जॅक्सन याने सोशल मीडियाद्वारे आपल्याशी मैत्री जमवली आणि नोकरी देण्याच्या बहाण्याने विविध बँक खात्यात आपल्याला पैसे भरायला सांगून लुबाडले, असे युवतीने तक्रारीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com