Goa Municipality Elections : निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच!

काँग्रेस उतरवणार दहा उमेदवार
Panchayat Elections in Goa
Panchayat Elections in GoaDainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने राजकीय पक्षांमध्ये तयारीला वेग आला आहे. आता लवकरच प्रत्येक राजकीय पक्ष आपले पॅनल जाहीर करणार असून फोंडा पालिका सत्ताधारी पक्षाबरोबर राहत असल्याचे इतिहास सांगत असल्यामुळे भाजप पॅनलची उमेदवारी मिळविण्याकरता रस्सीखेच सुरू झाली आहे.

मागच्या खेपेलाही मनोज केणी व विद्या पुनळेकर यांनी अशीच आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेवर ‘स्टे’ न दिल्यामुळे या याचिकेचा कोणताही परिणाम निवडणुकीवर झाला नव्हता.

Panchayat Elections in Goa
Goa Municipality Elections : मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा लागणार कस

आता यावेळी काय होते हे बुधवारी कळू शकेल. पण तारीख जाहीर झाल्यामुळे निवडणुकीचे पडघम जोरात वाजायला सुरुवात झाली असून अनेकजण आपले नशीब अजमावण्याकरता तयारीला लागले आहेत. महिलांकरता आरक्षित झालेल्या प्रभागात आपल्या सौभाग्यवतीला वा मुलीला रिंगणात उतरविण्याच्या प्रयत्नात काही आजी-माजी नगरसेवक आहेत.

नगरसेवक शांताराम कोलवेकर यांचा प्रभाग क्रमांक दहा इतर मागासवर्गीयांतील महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे ते आपल्या सौभाग्यवतीला रिंगणात उतरविणार असल्याचे कळते. त्या भाजप पॅनलतर्फे लढू शकतात.

Panchayat Elections in Goa
Car Accident Goa: ओव्हरटेक करणाऱ्या कारची दुचाकीला धडक, ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यू

माजी नगराध्यक्ष किशोर नाईक हेही हाच फॉर्म्युला गिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांचाही प्रभाग महिलांकरता आरक्षित झाल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा प्रभाग सलग तीन निवडणुकांत आरक्षित झाल्यामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे, असा त्यांचा दावा आहे.

२०१३ साली झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती रिंगणात उतरल्या होत्या; पण त्यावेळी त्यांना पराभूत व्हावे लागले होते. प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रभाग क्रमांक तीनची मते घुसडल्याचा दावा करून या प्रभागाचे माजी नगरसेवक विन्सेंट फर्नांडिस यांनी याचिका दाखल केली आहे. सध्या त्यांच्या सौभाग्यवती सीमा या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

काँग्रेस उतरवणार दहा उमेदवार

मगो पक्षाच्या ‘रायझिंग फोंडा’ या पॅनलने आपली तयारी सुरू केली असून त्यांच्याजवळ काही हुकमी एक्के असल्याचे दिसते आहे.

काँग्रेसही आठ ते दहा उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून तेही आपला पॅनल लवकरच जाहीर करणार असल्याचे कळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com