Goa News : उष्म्यामुळे घशाला कोरड; शीतपेयांची चलती

लिंबाचा दर वधारला; कलिंगडाची आवक वाढली; आईस्क्रिम दुकानांभोवती गर्दी
Summer drink
Summer drinkDainik Gomantak

राज्यात उन्हाची झळ अधिकच वाढत आहे. या उन्हामुळे घशाला कोरड पडते. यातून विसावा मिळविण्यासाठी विविध शीतपेये, फळांचा स्स, फळे, शहाळी यांना बाजासत लोकांकडून मागणी वाढली आहे. दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने शीतपेयांच्या दुकानात वर्दळ वाढली आहे.

बाजारात कलिंगडांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. 30 रुपये प्रतिकिलो दराने कलिंगडांची विक्री केळी जात आहे. आईस्क्रीम विक्रेत्यांच्या दुकानांभोवती गर्दी होत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्या, मोठे रुमाल, गॉगल्स विक्रीला प्रतिसाद आहे.

वाढत्या उष्म्यामुळे राज्यात लिंबांचे दर वाढले आहेत. लिंबू सरबत, लिंबू सोडा आदी शौतपेये बनविण्यासाठी मागणी वाढल्याने 2 रुपयांना 1 मिळणारे लिंबू आता 5 ते 6 रुपये एक या दराने विकले जात आहे. 50 रुपयांना आठ ते दहा लिंबू विकली जात आहेत.

Summer drink
आमोणे पुलावरून उडी मारलेल्या व्यक्तीचा अखेर मृतदेह सापडला...

फालुद्याची लोकांना आवड

विविध प्रकारचे फ्रूट शेक्स, लस्सी व इतर शीतपेयांसोबतच फालुद्याला लोकांची अधिक मागणी आहे. कारण यात रोज सिरप आणि सब्जाचे बी असते जे प्रकृतीला थंड असल्याने त्याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. सब्जामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्लिअम, मँगनिज, मॅग्नेशिअम आणि फास्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात.

Summer drink
Protest In Delhi : गोव्यातील पर्यावरणप्रेमी दिल्लीच्या जंतरमंतरवर; ओल्ड गोव्यातील 'त्या' बंंगल्यावर कारवाईची मागणी

फळरसाला अधिक मागणी

लोक शीतपेयांऐवजी फळांच्या रसाचे सेवन करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे पपई, चिकू, केळी, अननस आदीच्या रसांना मागणी वाढली असून 60 रुपये प्रतिग्लास दराने सध्या विक्री सुरू आहे. त्यात जर आईस्क्रीम टाकले तर 90 रुपये दर होतो.

100 हून अधिक दराचेदेखील शेक उपलब्ध असून उष्म्यापासून बचावासाठी नागरिक आवर्जून या रसांचा आस्वाद घेताना दिसतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com