आसावरी कुलकर्णी ठरल्या सत्तरीत कोवॅक्सीन लस घेणाऱ्या पहिल्या महिला

Padmakar Kelkar
बुधवार, 29 जुलै 2020

सध्या देशभरात ‘कोविड - १९’ रोगाने थैमान घातल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. या कोविडच्या नायनाटासाठी विविध उपाययोजना, चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी कोवॅक्सीन ही लस निरोगी माणसांना दिली जाऊन तिच्या प्रभावाची चाचपणी सुरू आहे. गोव्यात या लसीची चाचपणी माणसांवर केली जात आहे. त्यात महिलांनी सर्वात प्रथम पुढाकार घेत या समाज कार्यात उडी घेतली आहे.

वाळपई

सत्तरी तालुक्यातील नारायणनगर - होंडा येथील आसावरी कुलकर्णी या महिलेने स्वत: पुढाकार घेऊन काल ही लस घेतली. रेडकर इस्पितळात काल त्यांना ही लस देऊन तीन तास इस्पितळात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. नंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.
आसावरी कुलकर्णी या गोव्यातील दुसऱ्या महिला, तर सत्तरीतून लस घेणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. ही लस अनेकांवर देण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर येत्या काळात कोविड १९ विरोधात लढण्यासाठी ही लस उपयुक्त ठरणार आहे. गोव्यातून लस घेणारी पहिली महिला म्हणून मयुरा केणी यांचे नाव नमुद झाले आहे.
कोरोना विरोधात लढण्यासाठी स्वत:वर अशा लसी घेऊन सामाजिक योगदान देण्यासाठी महिला वर्गाने सर्वात प्रथम पुढाकार घेतल्याने कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ मिळणार आहे. सध्या आसावरी कुलकर्णी यांचे सत्तरीतून कौतूक होत आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या