गोवा पॉलिटेक्नीकच्या गारमेंट टेक्नोलॉलीच्या प्रमूख रहिला खान यांना जीवन गौरव पुरस्कार

 Asia Fashion Lifetime Achievement Award goes to Rahila Khan
Asia Fashion Lifetime Achievement Award goes to Rahila Khan

पणजी: आंतरराष्टीय फॅशन सप्ताहानिमित्त एशिया फॅशन  पुरस्कार सोहळ्याचे अलिकडेच सिदादी गोवा हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध राष्ट्रीय पातळीवरील मॉडेल्सना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले या पुरस्कारापैकी सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे ‘जिवन गौरव’ पुरस्कार गोवा पॉलिटेक्नीकच्या गारमेंट टेक्नोलॉलीच्या प्रमूख आणि वरील सोहळ्याच्या आयोजन प्रमूख श्रीमती रहिला खान यांना हा वरील पुरस्कार जाहीर करण्यात आला.

या सोहळ्याला सन्मानीय पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रसिध्द अभिनेत्री सौ.अमिता नायक सलत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार श्रीमती रहिला खान याना प्रदान करण्यात आला. यावेळी आंतराष्टीय फॅशन सप्ताहाचे संस्थापक डायरेक्टर श्री. विलीयम झेवियर तसेच राष्टीय पातळीवरचे कोरोग्राफर्स श्री. संजय आणि श्री. सन्मान उपस्थित होते. विविध पुरस्कार सोहळ्याबरोबर देशभरच्या विविध मॉडेल्सनी सादर केलेला अत्यंत देखणा आणि बहारदार असा ‘फॅशन शो’ ही यावेळी खास आकर्षण ठरला.


गोवा राज्य कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी आमदार श्री. आन्गेलो फर्नांडीस या सोहळ्याला प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवाय इतर राजकीय पक्षाचे कित्येक प्रमुख पदाधिकारी तसेच पॉपसिंगर सोनीय सिरसाट यावेळी खास आमंत्रित म्हणून उपस्थित होते. तब्बल सात तासपर्यंत चाललेल्या या शानदार सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. डेजमंड आॅलीव्हेरा यानी केले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com