'गोमेकॉ'कडून रिक्त जागांसाठी घेतलेल्या मुलाखतींवेळी सामाजिक अंतराचा फज्जा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

मुलाखतीसाठी जमलेल्या हजारो उमेदवारांची गोमेकॉत गर्दी झाली. यामुळे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने याबाबत कालच्या प्रकारामुळे  आरोग्य खाते गंभीर नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

संदीप देसाई
बांबोळी- आरोग्य खात्यातील रिक्त जागांसाठी गोमेकॉकडून काल परीक्षा घेण्यात आली. या दरम्यान परीक्षा केंद्राबाहेर मुलाखतीसाठी जमलेल्या हजारो उमेदवारांची गोमेकॉत गर्दी झाली. यामुळे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने याबाबत कालच्या प्रकारामुळे  आरोग्य खाते गंभीर नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

'गोमेकॉ'त काल 2 डॉक्टरांना आधी कोरोना होऊन गेल्यावरही काल परत बाधा झाली. कोरोनाची परिस्थिती राज्यात बिकट होत असताना अशावेळी परीक्षा मुलाखाती घेण्यात आल्या. त्यासुद्धा कोणतेही सामाजिक अंतर पाळल्याशिवाय घेतल्या गेल्याने   सरकार गंभीर नसल्याचे तीव्र शब्दात बोलले जात आहे. दरम्यान याठिकाणी पोलिस बंदोबस्तही नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचेही अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

संबंधित बातम्या