वैदिक संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करा ः श्री ब्रह्मेशानंदाचार्य

संजय घुग्रेटकर
रविवार, 26 जुलै 2020

आजपासून हिंदूंच्या प्रत्येक घरामध्ये दीपाची पूजा होणार, देव पूजन होणार. यासाठीच ऑनलाइन पुरोहित प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे. संपूर्ण हिंदू समाजाने याचा आस्वाद घ्यावा. आपल्या वैदिक संस्कृतीने दिलेले शिक्षण ग्रहण करा, ते आत्मसात करा. आता ऑनलाइन जरी पौरोहित्य होत असेल तरी इतकी वर्षे पौरोहित्य करणाऱ्या पुरोहिताचा समाजाने जरूर विचार करावा. ज्ञानपिपासू होऊन ही विद्या आत्मसात करा. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, सच्चिदानंदाची प्राप्ती होणार आणि गृहस्थाश्रम सफल होणार, असे संबोधन सद्‍गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी तपोभूमी येथे ऑनलाईन वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

खांडोळा

ते पुढे म्हणाले, आपला हिंदू धर्म प्राचीन धर्म आहे. सनातन वैदिक धर्मामध्ये अग्नीची महानता सांगितलेली आहे. आपल्या घराला तेव्हाच गृहस्थाश्रमाचे स्वरूप प्राप्त होणार ज्यावेळी तिथे अग्नीची स्थापना केली जाते. अग्नीची स्थापना जर झाली असेल तर मनुष्य त्याठिकाणी राहू शकतो. देवघरामध्ये प्रतिदिन दीप प्रज्वलित करणे हीच आपली संस्कृती आहे. ज्या गृहस्थाश्रमामध्ये देवघरात दीप प्रज्वलित केलेला असतो ते घर अग्नीचे घर, देवाचे घर मानले जाते. अशा घरातील सर्वांना देवाच्या सान्निध्यात राहण्याचे सौभाग्य प्राप्त होते. जर घरामध्ये या दीपाची पूजा करणारे जर नसेल तर देवाला कसं वाटेल ? भले उशीर झालेला असेल, पण आता आपण सर्वांनी या वर्गाद्वारे माहिती घेऊन पूजन करावे, सर्व विधी व्यवस्थित पार पाडाव्यात.
श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी - गोवा धर्मसेवेच्या माध्यमातून प्रारंभ झालेल्या ऑनलाइन पुरोहित वर्गाच्या उद्‍घाटन ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन करकमलाद्वारे नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर उद्‍घाटन करण्यात आले.
तंत्रज्ञातील तज्ञ व टेक्नॉलॉजीचे प्रमुख फोंडू अश्वेकर यांच्या मार्गदर्शनाने ही ऑनलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाइन सेवेअंतर्गत प्रथम वर्गाला शिक्षक म्हणून वेदाचार्य सिद्धेश यांनी प्रारंभ केला त्यांना तांत्रिक साहाय्य ज्ञानदेव कालापूरकर यांनी केले. दिपक गावस, सामाजिक विभाग प्रमुख व सदानंद केदार यांच्या नेतृत्वाखाली हे वर्ग सुरू राहाणार आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ज्ञानार्जन तसेच पुण्यार्जन करण्याची सुसंधी सर्वांना प्राप्त होत आहे.

उपक्रमाचे स्वागत
पूज्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाने सुरू झालेल्या या उपक्रमाची गोव्यात तर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष दखल देखील घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्वागत केले आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपले संदेश पाठविले आहेत. जनता जनार्दनाने पुण्यार्जन करून समाजात शांती तथा एकता निर्माण व्हावी, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. अशा या ऑनलाइन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गोमंतकीयांना श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे करण्यात येत आहे.

संपादन ः संजय घुग्रेटकर

संबंधित बातम्या