"पीडब्ल्यूडी"च्या कंत्राटी कामगारांना दिवाळी भेट ?

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागात कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या आणि मागील चार ते पाच महिने वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांना आता दिवाळीची अनोखी भेट मिळण्याची आशा आहे.

डिचोली: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागात कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या आणि मागील चार ते पाच महिने वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांना आता दिवाळीची अनोखी भेट मिळण्याची आशा आहे. या कामगारांचे थकीत वेतन दिवाळीत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

अखिल भारतीय मजदूर संघाचे गोवा प्रदेश महामंत्री कृष्णा पळ यांनी ही माहिती देवून लवकरच या कामगारांच्या हाती वेतन पडण्याच्या आशा पल्लवीत झाल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागात मिटर रिडर मिळून अनेक कामगार मागील काही वर्षापासून कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. "कोविड" संकटामुळे मागील चार ते पाच महिन्यांपासून हे कामगार वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे हे कामगार आर्थिक अडचणीत आले आहेत. ऐन दिवाळी सणात हे कामगार विवंचनेतआहेत. 

या पार्श्वभूमीवर या कामगारांनी मजदूर संघाचे गोवा प्रदेश महामंत्री कृष्णा पळ यांच्यासमवेत अलीकडेच साखळी येथे रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन या कामगारांचा प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असे कृष्णा पळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या