पर्यटकांची चार्टर विमानाने 15 ऑक्टोबर पासून गोव्यात उतरणार

15 ऑक्टोबर पासून गोव्यात पर्यटकांची चार्टर विमाने उतरतील अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली.
पर्यटकांची चार्टर विमानाने 15 ऑक्टोबर पासून गोव्यात उतरणार
Union Home Minister Amit ShahDainik Gomanatk

फोंडा: गोव्याच्या पर्यटनाला चालना देताना केंद्र सरकार च्या अनेक योजना चालीस लावल्या जातील त्यात पर्यटन व्यावसायिकांना 10 लाख पर्यंत तर दुरिस्ट गाईडना 1 लाख पर्यंत कर्ज योजना सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल त्याच बरोबर येत्या 15 ऑक्टोबर पासून गोव्यात पर्यटकांची चार्टर विमाने उतरतील अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिली.

Union Home Minister Amit Shah
Goa Politics: अंमली पदार्थ विकणारे निवडणुकीचे उमेदवार झालेत !

धारबांदोडा येथे फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाच्या भूमीपूजन सोहळ्यावेळी अमित शहा बोलत होते. आज गुरुवारी या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले गोव्यातील प्रशासन अस्थिर होते ते भाजप सरकारने विकासाच्या माध्यमातून स्थिर केले. मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मोठे प्रयत्न केले त्याचाच पुरस्कार आज विद्यमान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचाकडून होत असल्याने गोमंतकीयांनी भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करावे असे आवाहन अमित शहा यांनी उपास्थितांना केले.

Related Stories

No stories found.