Atal Setu Viral Video : अटल सेतूवरील खड्ड्यांचा व्हिडिओ मीडियावर व्हायरल

आम आदमी पक्षाच्या नेत्या सेसिल रॉड्रिग्ज यांनी ट्विटरवर व्हिडीओ केला शेअर
Atal Setu Viral Video : अटल सेतूवरील खड्ड्यांचा व्हिडिओ मीडियावर व्हायरल
Atal Setu PotholesDainik Gomantak

पणजी : अटल सेतूवरील धोकादायक ठरत असलेल्या खड्ड्यांचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या तसेच रस्ता मोहिमेच्या प्रमुख सेसिल रॉड्रिग्ज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडियो टाकला आहे. सेतूवरील खड्डे अपघातांसाठी कारणीभूत ठरत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यात त्वरित लक्ष घालण्याची मागणी सेसिल रॉड्रिग्ज यांनी केली.

रॉड्रिज यांनी आपल्या वाहनात असलेल्या बागकामाचे साधन वापरून खड्ड्याची सखोलता तपासली. त्यात एक खड्डा खोल असल्याने हा चुकवण्यासाठी वाहन प्रयत्न करत असून येथे अपघात होण्याची शक्यता आहे, कारण अटल सेतूवर वाहनाने वेगाने येतात.

Atal Setu Potholes
निष्पाप निरागस ‘लकी’ ठरलाय अनलकी...!

रस्त्याचे बांधकाम केलेल्या कंत्राटदारावर कारवाई झाली पाहिजे. दुय्यम दर्जाचे काम केले असून, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे.त्यासाठी खात्याकडून कारवाई अपेक्षित आहे, असे रॉड्रिग्ज म्हणाल्या.

आता मॉन्सून सुरू झाला असून ही परिस्थिती आहे. त्यात सेतूवर अनेक खड्डे आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, अशी रॉड्रिग्ज यांनी सूचना केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com