‘एटीएम’ प्रकरणातील संशयित गोव्यात अटक

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

: आबिर्णे - सुकूर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन चोरीप्रकरणी गेल्या आठवड्यात तीन संशयित आरोपींना गोवा पोलीस गुन्हा अन्वेषण विभाग, उत्तर गोवा पोलिस आणि दिल्ली पोलिस विशेष पथक यांच्या संयुक्त प्रयत्नाने सिमापूर दिल्ली येथे  अटक केले होते. त्यातील दोन संशयित सफिकुल मुल्ला आणि महम्मद सफी यांना आज अटक करून पोलिसांनी गोव्यात आणले आहे.

पर्वरी : आबिर्णे - सुकूर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन चोरीप्रकरणी गेल्या आठवड्यात तीन संशयित आरोपींना गोवा पोलीस गुन्हा अन्वेषण विभाग, उत्तर गोवा पोलिस आणि दिल्ली पोलिस विशेष पथक यांच्या संयुक्त प्रयत्नाने सिमापूर दिल्ली येथे  अटक केले होते. त्यातील दोन संशयित सफिकुल मुल्ला आणि महम्मद सफी यांना आज अटक करून पोलिसांनी गोव्यात आणले आहे. त्यातील एक संशयित आरोपी रुस्तम शेख पोलिस झटापटीत जखमी झाल्यामुळे त्याला मागवून आणण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

संशयितांना ताब्यात घेण्यासाठी दिल्लीत गेलेल्या पथकात उपनिरीक्षक प्रतीक भट, परेश सिनारी तसेच पोलिस अजय कोरगावकर, दत्तराज चोडणकर, गणेश पार्सेकर, योगेश शिंदे, प्रज्योत परब, नीतेश गावडे, चंदन मळीक, महादेव गावस, तुषार राऊत यांचा समावेश होता. या पथकाने चांगली कामगिरी बजावली म्हणून पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी त्यांचे आभिनंदन केले.

यासंबंधीचे सविस्तर वृत्त असे की, आबिर्णे -सुकुर येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन चोरी प्रकरणी गुंतलेले सर्व संशयित बांगलादेशी असून ते चोरीच्या उद्देशाने गोव्यात आले होते. कळंगुट येथे एका हॉटेलात ते राहत होते. त्यांनी एक रेंट अ कॅब भाड्याने घेतली व शनिवार आणि रविवार सकाळपर्यंत पर्वरी परिसरात रेकी केली असता त्यांना सुकुर येथे कमी लोकवस्ती असलेल्या ठिकाणी असलेल्या एटीएम मशीनवर लक्ष गेले आणि त्यांनी ते चोरण्याचा बेत आखला. रविवारी सकाळी रेंट अ कॅब त्यांनी त्या मालकाला परत केली व बस्तोडा येथील एक रिक्षा चोरली व ती चोरीसाठी वापरली. बस्तोडा येथील मालकाने आपली रिक्षा चोरीस गेली, अशी तक्रार म्हापसा पोलिस स्थानकात दिली होती, अशी माहिती निरीक्षक देऊलकर यांनी दिली. उत्तर गोवा अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उप अधीक्षक एडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निनाद देऊलकर हे पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या